शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जायखेडा परिसरात पाऊस

By admin | Updated: April 6, 2016 22:57 IST

शेतकऱ्यांमध्ये चिंता : कांद्याचे नुकसान होण्याची भीती

जायखेडा : येथील परिसरासह सटाणा तालुक्यातील बहुतांशी भागात बुधवारी सकाळी वादळ व विजेच्या कडकडाटासह तुरळक पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. ढगाळ हवामान वाढल्याने शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच कांद्याचेही नुकसान होणार असल्याची शक्यता काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.संकटांची मालिका पाठ सोडत नसल्याने शेतकरी पुरता धास्तावला आहे. डाळींब व अन्य नगदी पिके आधीच धोक्यात आल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने कांद्याची लागवड केली आहे. कळवण, देवळा, सटाण्यासह मालेगाव तालुक्यात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. महागडे बियाणे घेऊन दुष्काळावर मात करीत कांद्याचे थोडेफार पीक शेतकऱ्यांच्या हाती येणार आहे. त्यातच बाजारभाव गडगडल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांना कांदे सोडून द्यावे लागले आहेत. अशा दुष्टचक्र ात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर पुन्हा अस्मानी संकट घोंगावत आहे. दुष्काळावर मात करीत पिकवलेला कांदा काढणीचे काम सध्या वेगात सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतातच काढून पडला आहे. वातावरणात बदल होऊन पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. शेतात काढून ठेवलेला कांदा प्लॅस्टिकच्या कागदांनी झाकून पाण्यापासून वाचविण्याचा शेतकरी प्रयत्न करीत आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे कांदे भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. (वार्ताहर)