शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
3
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
4
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
5
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
6
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
7
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
8
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
9
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
10
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
11
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
12
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
13
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
14
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
15
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
16
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
17
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
18
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
19
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
20
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर

विद्यार्थ्यांनी बनवली रेसिंग कार

By admin | Updated: February 19, 2015 23:40 IST

माने महाविद्यालय : इंडियन कार्ट रेसिंग स्पर्धेत १९वा क्रमांक

देवरुख : राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आॅटोमोबाईल व मेकॅनिकल शाखेच्या विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम फॉर्म्युला रेसिंग कार व गो कार्टची निर्मिती केली आहे. या पहिल्या रेसिंग कारने तामिळनाडू येथे झालेल्या इंडियन कार्ट रेसिंग स्पर्धेत १९ वा क्रमांक पटकावला आहे.फॉर्म्युला डिझाईन कॉम्पिटीशन (एफडीसी) २०१५ व इंडियन कार्ट रेसिंग (आयसीआर) २०१५ या स्पर्धेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. ही स्पर्धा करी रोड स्पीड वे, कोईम्बतूर, तामिळनाडू येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत फॉर्म्युला रेसिंगसाठी भारतातून ४४ व गो कार्ट रेसिंगसाठी ७९ अभियांत्रिकी महाविद्यालये सहभागी झाली होती. त्यामध्ये आयआयटी, मुंबई, के. जे. सोमय्या मुंंबई, मणिपाल युनिव्हर्सिटी, व्हीआयटी वेल्लोरे यांसारख्या अग्रमानांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांचा समावेश होता.स्पर्धेसाठी फॉर्म्युला स्टुडंट्स आॅफ जर्मनी (एफएसजी) चे सदस्य परीक्षक म्हणून आले होते. फॉर्म्युला रेसिंग या स्पर्धेत महाविद्यालयाचा विसावा तसेच गो कार्ट रेसिंगमध्ये १९ वा क्रमांक आला. या स्पर्धेमध्ये १७८ संघांनी प्रवेश परीक्षा दिली. त्यामधून ४४ संघांची निवड झाली, तर अंतिम स्पर्धेमध्ये या महाविद्यालयाच्या टीमने २०वा क्रमांक मिळविला. यशस्वी कार स्टुडंट टीममध्ये अक्षय राजमाने, निखील कारेकर, रोहन शिंदे, ज्ञानेश दाते व अन्य सातजण गो कार्टचे विद्यार्थी सदस्य होते. निखील सनगर, सिमरनजीत सिंग, अनिकेत तांबे, मयूर राऊळ, गौरांग कदम, ओंकार कामटेकर, आदित्य पवार, दत्तप्रसाद पोकळे, मुसेब मोडक व अन्य यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)आमच्या विद्यार्थ्यांमध्येदेखील शहरी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा अधिक हुशारी आहे. हे विद्यार्थी नक्कीच उत्तरोत्तर प्रगती करत राहणार आहेत.- डॉ. जी. व्ही. मुळगुंद, प्राचार्य, राजेंद्र माने महाविद्यालयआंबवसारख्या ठिकाणी शिकून या विद्यार्थ्यांनी कार बनवली आणि तीदेखील राष्ट्रीय स्पर्धेत क्रमांकप्राप्त ठरली, हे खरोखरच आमच्यासाठी गौरवास्पद आहे. विद्यार्थ्यांचे अभिनंदन.- रवींद्र माने,संस्थाध्यक्ष, माने महाविद्यालय1फॉर्म्युला रेसिंग स्पर्धेसाठी टीमचे नाव ‘एमएच - ०८ रेसिंग’ असे आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या गाडीची इंजिन क्षमता ६०० सीसी इंजिन असून, गाडी तासी १२० किलोमीटर प्रतितास वेगाने पळते.2गो कार्टिंग स्पर्धेसाठी टीमचे नाव ‘टीम फूल थ्रोटल’ असे आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गाडीचे इंजिन महिंद्रा रोडिओ सीव्हीटी या श्रेणीतील १२५ सीसी क्षमतेचे आहे. गाडी तासी ८० किलोमीटर प्रतितास वेगाने पळते.3एमएच-०८ रेसिंग टीमने बनवलेल्या स्टुडंट फॉर्मुला कार ० ते १०० मीटर अंतर ६ सेकंदात पार करु शकते.