शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

वर्गदुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: May 22, 2016 00:46 IST

जिल्हा परिषद : तब्बल १ हजार ९ धोकादायक वर्गखोल्या

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील ५७६ प्राथमिक शाळांच्या १००९ वर्गखोल्या नादुरुस्त झाल्या असून, धोकादायक स्थितीत आहेत. या वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी सुमारे ११ कोटी १४ लाख ५० हजार रुपयांची आवश्यकता आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून या वर्गखोल्यांना अपुरे अनुदान मिळत असल्याने या वर्गखोल्यांची दुरुस्ती रखडली आहे. रस्त्यांच्या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळत असताना शाळांच्या दुरुस्तीसाठी अनुदान का नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. दरवर्षी वर्गखोल्या दुरुस्तीचा हा आलेख वाढत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. त्यामध्ये शिक्षकांना प्रशिक्षण तसेच नवनवीन उपक्रम राबविण्यावर हा खर्च करण्यात येतो. मात्र, धोकादायक शाळांतील वर्गखोल्यांच्या दुरुस्तीला शासनाकडून पुरेसे अनुदान दिले जात नसल्याने पालकवर्गामध्येही तीव्र नाराजी आहे. या शाळांच्या इमारतीमधील वर्गखोल्यांच्या भिंतींना तडे गेले आहेत तर अनेक वर्गखोल्यांची छप्परे मोडकळीस आल्याने त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील १००९ वर्गखोल्या नादुरुस्त झाल्या आहेत. पावसाळा तोंडावर आला असतानाही या वर्गखोल्याच्या दुरुस्तीकडे जिल्हा परिषद प्रशासनाने लक्ष पुरवलेले नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. या नादुरुस्त वर्गखोल्यांची वेळेत दुरुस्ती होणे आवश्यक आहे. ती न झाल्यास पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वर्गखोल्यांमध्ये पाण्याची गळती लागून विद्यार्थ्यांची वह्या, पुस्तके भिजणार आहेत. मागील आर्थिक वर्षामध्ये डीपीडीसीतून वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी १ कोटी १० लाख रुपये तर सेसफंडातून ५० लाख रुपये असे एकूण १ कोटी ६० लाख रुपयांचे अनुदान जिल्हा परिषदेला प्राप्त झाले होते. त्यातून १५० वर्गखोल्यांची दुरुस्ती करण्यात आली. उर्वरीत ५७६ प्राथमिक शाळांमधील १००९ वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी ११ कोटी १४ लाख ५० हजार रुपयांची आवश्यकता आहे. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे या वर्गखोल्यांची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी होणे आवश्यक होते. मात्र, मागणी करुनही अनुदान न मिळाल्याने या धोकादायक वर्गखोल्यांमध्येच विद्यार्थ्यांना विद्येचे धडे घ्यावे लागणार आहेत.(शहर वार्ताहर)