शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सुखटणकर यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह

By admin | Updated: March 17, 2016 23:39 IST

डॉ. संजय देशमुख : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीकडून मागवला खुलासा

रत्नागिरी : गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या प्राध्यापक पदाच्या नियुक्ती कागदपत्रांमध्येच संदिग्धता आढळल्याने याबाबतचा खुलासा संस्थेकडून होईपर्यंत विद्यापीठाने त्यांच्या या मान्यतेला स्थगिती दिली आहे. तसेच त्यांच्याकडे असलेल्या प्रभारी प्राचार्यपदालाही स्थगिती देण्यात आल्याची माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.डॉ. देशमुख रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह््यांतील प्राचार्यांसमवेत होणाऱ्या तीन महिन्यांच्या आढावा बैठकीसाठी रत्नागिरीत आले होते. यावेळी सुमारे ५७ महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य उपस्थित होते. याबाबत माहिती देताना डॉ. देशमुख म्हणाले की, आज देवरूख येथील महाविद्यालयात नॅकची प्रक्रिया सुरू असल्याने त्यासाठीही उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. आत्तापर्यंत ४२ महाविद्यालयांना आपण भेटी दिल्या, त्यापैकी १४ महाविद्यालये ही नॅक मानांकनप्राप्त होती. मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या ६७९ महाविद्यालयांपैकी ५४ महाविद्यालयांना ‘अ’ श्रेणी मिळाल्याची माहिती डॉ. देशमुख यांनी दिली.पूर्वी उशिरा होणाऱ्या परिक्षांचेही वेळापत्रक बदलून ते अलिकडचे केले आहे. याचबरोबर इतरही अभिनव बदल विद्यापीठाने केले असल्याचे त्यांनी सांगितले.रत्नागिरीतील गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुखटणकर यांच्या प्राध्यापकाच्या नियुक्तीवेळी सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये तफावत आढळली आहे. त्यामुळे याबाबत संस्थेकडून खुलासा मिळत नाही, तोपर्यंत त्यांच्या प्राध्यापक आणि त्यांच्याकडे असलेल्या प्रभारी प्राचार्यपदालाही स्थगिती देण्यात आली आहे. याबाबतची उत्तरे संस्थेकडून मिळत नाहीत, तोपर्यंत प्राचार्यपदाची जबाबदारी ज्येष्ठ प्राध्यापकाकडे देण्यात यावी, असेही संस्थेला विद्यापीठाकडून कळविण्यात आल्याची माहिती डॉ. देशमुख यांनी यावेळी दिली. (प्रतिनिधी)स्कील डेव्हलपमेंट‘मेक इन इंडिया’ अंतर्गत झाराप येथे शासनाने २०० एकर जमीन देऊ केली आहे. त्यावर कोकणच्या दृष्टीने आवश्यक कौशल्ये विकसीत करणारे अभ्यासक्रम सुरू करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. कोकण रेल्वेच्या सहकार्याने एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून रत्नागिरीत रेल्वे रिसर्च सेंटर सुरू करणार आहे. मंत्रालयाकडून पहिल्याच टप्प्यात एक कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.रशिया आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात ‘युरल फेडरेशन युुनिव्हर्सिटी’च्या माध्यमातून आॅनलाईन एमबीएची सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.