शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीनजीक एकाचा गोळी घालून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:20 IST

कोतवडे येथील वेतोशी रोडवर असणाऱ्या घारपुरे वाडी येथे गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास भिकाजी कृष्णा कांबळे यांच्यावर बंदुकीने गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली आहे. 

रत्नागिरी : शहरापासून जवळच असणाऱ्या कोतवडे येथील वेतोशी रोडवर असणाऱ्या घारपुरे वाडी येथे गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास भिकाजी कृष्णा कांबळे यांच्यावर बंदुकीने गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीची धामधूम संपूर्ण जिल्ह्यात सुरु असताना घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली हे अद्यापही स्पष्ठ झालेले नाही. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हत्याराचा वापर करून हत्या करण्यात आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मयत भिकाजी कृष्णा कांबळे हे रंगारी होते व ते रंगकामाचे ठेके घेत असत. यातीलच व्यवहारावरून ही घटना घडली असल्याचे देखील बोलले जात आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी कांबळे दोघा इसमांसोबत बोलत असताना काही ग्रामस्थांनी बघितले होते. या अनोळखी दोन इसमांकडे लाल रंगाची दुचाकी होती अशी देखील कुजबुज ऐकायला मिळत आहे.वेतोशी येथील भिकाजी कृष्णा कांबळे हे पंचक्रोशीत रंग काम करण्याचे काम करतात. परिसरातील छोटी मोठी घरे, बंगले यांचे रंगकाम ते करत. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री ते आपल्या घरी जाताना वेतोशी मार्गावरील घारपुरे वाडी नजीक अज्ञात व्यक्तीने  रिव्हॉल्व्हरने  केलेल्या फायरिंगमध्ये भिकाजी कांबळे यांच्या छातीत गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले हत्या झालेल्या ठिकाणा जवळून जाणारा मार्ग जंगलमय असल्याने हत्या नेमकी कोणी केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.गोळीबाराच्या आवाजामुळे परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी एकत्र आले त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना दिली. ग्रामीण पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी भेट दिली तर पाेलीस उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे घटनास्थळी दाखल झाले.