शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

दापोली शहरात सेनेला धक्का

By admin | Updated: October 23, 2014 00:04 IST

भाजपला साथ : सत्ताधाऱ्यांना मतदारांनी डावलले

शिवाजी गोरे- दापोली -दापोली नगरपंचायतीवर शिवसेनेची सत्ता आहे. नगराध्यक्षपदी मुस्लिम समाजाला स्थान दिल्यास मुस्लिम व्होट बँक आपल्या बाजूने राहील, असा विश्वास सेनेला होता. मात्र, हा अंदाज चुकला असून, दापोली शहरात भाजपला सर्वाधिक मते मिळाली आहेत. तसेच खेड - मंडणगड शहरानेसुद्धा सेनेला नाकारल्याने सेनेच्या मताधिक्यात घट झाल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागात चांगली मते घेऊनसुद्धा सेनेचे पाचवेळा विजय झालेले दळवी यांना पराभव पत्करावा लागला आहे.दापोली नगरपंचायतीत अडीच वर्षांनंतर राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक गळाला लागल्यानंतर शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला. विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून मुस्लिम समाजाला नगराध्यक्षपदाची संधी देण्यात आली. मुस्लिम समाजाला नगराध्यक्षपद दिल्याचे भांडवल करुन मुस्लिम व्होट बँक दळवी यांच्या पाठीशी असल्याचा प्रचार केला जात होता. तालुक्यातील मुस्लिम समाजात मुस्लिम नगराध्यक्ष हाच प्रचाराचा मुद्दा केला जात होता. परंतु याचा कोणताही परिणाम दिसून आला नाही. भाजपचे उमेदवार केदार साठे यांना दापोली शहरातील मतदारांनी पहिल्या पसंतीची मते देऊन शिवसेनेला नाकारले. दापोली शहरात राष्ट्रवादीचे संजय कदम यांनासुद्धा चांगली मते मिळाली. कदम यांनी शहरात कोणत्याही प्रकारचा प्रचार केला नव्हता. दोन वर्षात एकदाही दापोलीतील कार्यक्रमाला हजेरी लावली नव्हती. शहरात पक्षाच्या माध्यमातून एखादा कार्यक्रम घेतला नव्हता. येथील जनतेसाठी एखादी सभासुद्धा घेतली नाही तरीही जनतेने त्यांना चांगली मते दिली. संजय कदम यांनी प्रचार हा ग्रामीण भागावर केंद्रित केला होता. कदम हे खेडचे असल्याने त्यांना मतदार नाकारतील, हा समज मतदारांनी चुकीचा ठरवला.खेड शहरात मनसेची सत्ता आहे. अपेक्षेप्रमाणे खेड शहरातील मतदारांनी मनसेला पहिल्या पसंतीची मते दिली. राष्ट्रवादीला दोन नंबरची मते मिळाली. खेड शहरात मनसेचे वैभव खेडेकर यांनी केलेले काम जनतेला ज्ञात आहे. खेड शहरात त्यांची सत्ता असल्याने त्यांना मतदारांनी चांगली पसंती दिली. खेड शहरात राष्ट्रवादीला कमी मते मिळाली. तरीही खेड तालुक्यातील ग्रामीण जनतेने संजय कदम यांना मताधिक्य दिल्याने त्यांचा विजय सोपा झाला.मंडणगड ग्रामपंचायतीवर सेनेची सत्ता आहे मंडणगडात सेनेला मताधिक्य मिळेल, असे वाटत होते. मात्र, मंडणगड शहरातील जनतेने राष्ट्रवादीच्या संजय कदम यांना साथ देऊन सेनेपेक्षा अधिक मताधिक्य दिले. मंडणगड तालुक्यात राष्ट्रवादीला चांगले यश मिळाल्याने कदम यांच्या विजयात मंडणगड तालुक्याची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली.कदम यांनी सभा घेतली नाहीराष्ट्रवादी काँग्रेसचे संजय कदम यांनी प्रचारासाठी तालुक्यात एकही सभा लावली नाही. भास्कर जाधव यांनी एक दिवस दापोली-मंडणगड तालुक्यात धावती सभा घेतली. तीनही शहरात कोणत्याही बड्या नेत्याची सभा झाली नाही. कदम यांच्या प्रचारासाठी एकही स्टार प्रचारक दापोलीत आला नव्हता. निवडणुकीदरम्यान केवळ ग्रामीण कार्यकर्त्यांची फौज घेऊन ते एकटेच प्रचार करत होते. राष्ट्रवादीत बंडखोरी होऊनसुद्धा ते विजय झाले. त्याउलट सेनेचे दळवी यांच्यासाठी केंद्रीयमंत्री अनंत गीते यांनी सभा घेतली होती. सेनेचा प्रचार जोमाने सुरु होता.