शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्री भास्कर जाधव यांना धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 05:29 IST

गुहागर नगर पंचायतीत शिवसेनेचा पाठिंबा असलेल्या शहर विकास आघाडीने नगराध्यक्ष पदासह पंचायतीवर सत्ता काबीज केली आहे.

रत्नागिरी : गुहागर नगर पंचायतीत शिवसेनेचा पाठिंबा असलेल्या शहर विकास आघाडीने नगराध्यक्ष पदासह पंचायतीवर सत्ता काबीज केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला १७ पैकी केवळ एकच जागा जिंकता आल्याने माजी मंत्री आ. भास्कर जाधव यांना मोठा धक्का बसला. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे राजेश बेंडल हे शहर विकास आघाडीकडून नगराध्यक्षपदी निवडून आले. गुहागरमध्ये शहर विकास आघाडी ९, शिवसेना १, भाजपा ६, राष्ट्रवादी १ असे पक्षीय बलाबल राहिले. देवरुख नगर पंचायत निवडणुकीत अनपेक्षितरीत्या भाजपाने बाजी मारली असून, नगराध्यक्षपदासह ७ जागा जिंकल्या. भाजपाच्या मृणाल शेट्ये नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. भाजपाला ७, मनसे १, शिवसेना ४, राष्ट्रवादी ३, काँग्रेस १ आणि अपक्षास एक जागा मिळाली.आजरा ताराराणीकडे : आजरा (जि. कोल्हापूर) : आजरा नगर पंचायतीत अशोकअण्णा चराटी यांच्या नेतृत्वाखालील आजरा शहर विकास आघाडीने वर्चस्व मिळवले. आजऱ्याच्या पहिल्या नगराध्यक्षा म्हणून जोत्स्ना अशोक चराटी विजयी झाल्या. १० जागा शहर विकास आघाडीला मिळाल्या. राष्ट्रवादी-काँगे्रस-शिवसेना आघाडीला केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागले. तर भाजपा-शिवसेना युतीला केवळ १ जागा मिळाली.