शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

कुवारबाव येथील भाजी विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:30 IST

रत्नागिरी : शहरानजीकच्या कुवारबाव येथील डी - मार्टजवळील भाजीविक्रेत्यांनी काेराेनाची चाचणी न केल्याने तसेच काहींकडे दहा दिवसापू्र्वी चाचणी केल्याचे ...

रत्नागिरी : शहरानजीकच्या कुवारबाव येथील डी - मार्टजवळील भाजीविक्रेत्यांनी काेराेनाची चाचणी न केल्याने तसेच काहींकडे दहा दिवसापू्र्वी चाचणी केल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. त्यामुळे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याप्रकरणी एका व्यक्तीकडूनही दंड आकारण्यात आला.

काेराेनामुळे तालुक्यातील आठवडा बाजार बंद करण्यात आले आहेत. तथापि अत्यावश्यक सेवेतील भाजीपाला, दूध व फळे यांची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार अत्यावश्यक सेवेतील भाजीपाला, दूध व फळे विक्रेते यांच्याकडे कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल सोबत ठेवणे बंधनकारक आहे. कुवारबाव येथील भाजीपाला विक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असल्याचे निदर्शनास आल्याने शुक्रवारी सकाळी १० वाजता तहसीलदार शशिकांत जाधव यांनी भाजीपाला विक्रीच्या ठिकाणी भेट देऊन तपासणी केली. यावेळी काहीजण कोरोना चाचणी न केल्याचे आणि काही जणांचे १० दिवसापूर्वी कोरोना चाचणी केल्याचे निदर्शानास आले. त्यामुळे त्यांनी भाजीपाला विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करत १२ हजार रुपयाची वसुली केली. याच ठिकाणी भाजी खरेदीस आलेल्या एका व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याचे तहसीलदार यांच्या निदर्शनास आले. संबंधित व्यक्तीवरही १ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

.................................

भाजीपाला विक्रीस प्रतिबंध

या ठिकाणी भाजी खरेदीसाठी होणारी गर्दी विचारात घेऊन दि. १ मे पासून कुवारबाव येथे भाजीपाला विक्रीस प्रतिबंध करण्यात आला आहे. येथील भाजीपाला विक्रेत्यांनी फक्त घरपोच सेवा देण्याचे आदेश तहसीलदार जाधव यांनी दिलेले आहेत. या आदेशाची सक्त अंमलबजावणी करण्याबाबतचे निर्देश पोलीस निरीक्षक शहर पोलीस ठाणे आणि ग्रामपंचायत कुवारबाव तसेच मंडल अधिकारी खेडशी व तलाठी खेडशी यांना दिलेले आहेत. या आदेशाचे उल्लघंन केल्यास संबंधित भाजी विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार जाधव यांनी दिली.