दस्तुरी : शासनाने पूरग्रस्त व्यापाऱ्यांना वीजबिलात सवलत देण्याचे जाहीर केले हाेते. ही सवलत देण्याची मागणी माजी आमदार संजय कदम यांनी केली आहे. याबाबत त्यांनी खेडचे तहसीलदार प्राजक्ता घाेरपडे व महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, २२ जुलै २०२१ रोजी झालेल्या पुरामध्ये व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. आम्ही सर्वच खेड शहरातील व्यापारी नियमित बिल भरणा करणारे व्यापारी आहोत. त्यामुळे कालावधीतील आलेली बिल बिलामध्ये आम्हाला राज्य शासनाच्या सवलतीत जाहीर केला. मात्र, ती रक्कम कमी प्रमाणात प्राप्त झाले. या सर्व परिस्थितीचे अवलोकन करून आम्हाला यातून सर्व व्यापाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी वीज बिलात सवलत देऊन सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत येत्या आठ दिवसांत निर्णय न झाल्यास सर्वच व्यापारी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खेड तालुकाध्यक्ष स. तु. कदम, खेड शहराध्यक्ष राजू संसारे, माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश मोरे, सुनील शिंदे, अविनाश वाडकर, नाना सावंत, पिंट्या जगताप तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते.