शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

गडनदी धरणग्रस्तांच्या समस्या अद्याप प्रलंबितच

By admin | Updated: March 5, 2016 00:01 IST

संगमेश्वर तालुका : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

चिपळूण : संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण प्रकल्पग्रस्तांच्या समस्या आजही प्रलंबित राहिल्या आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या समस्या तसेच विकासकामांबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व धरणग्रस्तांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.गडनदी धरण प्रकल्पग्रस्तांच्या समस्या वर्षानुवर्षे तशाच आहेत. या समस्यांवर तोडगाच काढण्यात आलेला नाही. असे असताना गडनदी प्रकल्पग्रस्तांनी आजपर्यंत शांततेच्या मार्गाने लढा दिला. अखेरीस प्रशासनाला जाग येऊ लाली आहे. धरणग्रस्तांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघटनाचे पदाधिकारी आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची बैठक नुकतीच पार पडली.या बैठकीत खेरशेत, नांदगाव, शिर्केवाडी, घाडगेवाडी या चार शासकीय तर येडगेवाडी व गायकरवाडी या दोन बाधित गावठाणांच्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी येडगेवाडी रस्ता अडवणूक प्रकरणी विकासाच्या आड येणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा दिला आहे. पुनर्वसन गावठाणातील अपूर्ण असलेली कामे पूर्ण व्हावीत यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दि. १९ डिसेंबर रोजी गडनदी पुनर्वसन गावठाणामधील अपूर्ण कामासंदर्भात दौरा केला होता. या दौऱ्यात अपूर्ण असलेल्या कामांची पाहणी केल्यानंतर कामांची अंदाजपत्रके तयार करुन ती सादर करावीत, अशा सूचना पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी विविध विकासकामांची ११ कोटी ९७ लाख रुपयांची अंदाजपत्रके तयार केली. ही अंदाजपत्रके जिल्हाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत सादर करण्यात आली. पुनर्वसन गावठाणांमध्ये प्रलंबित असलेल्या विकासकामांच्या यादीत गटारे, अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, नळपाणी योजना दुरुस्ती तसेच कुचांबे ते येडगेवाडी या मार्गाचे डांबरीकरण, आदी कामांचा समावेश आहे. तसेच खेरशेत पुनर्वसन गावठाणातील पाण्याची विहीर साफ करणे व ट्रान्सफार्मर ते स्मशानभूमी रस्ता खडीकरणासह आठ दिवसात तयार करुन अहवाल सादर करावा, अशा सूचना पाटबंधारे विभागाला या बैठकीत देण्यात आल्या आहेत. शासकीय गावठाणातील प्रकल्पग्रस्तांच्या भूखंडाचे सातबारे तातडीने कोरे करावेत, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. कुचांबे ते येडगेवाडी रस्ता डांबरीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सांगितले. यावेळी बैठकीला दिलीप सावंत, दिलीप गायकवाड, अरुण कदम, संतोष गायकवाड, तसेच सर्वपक्षीय प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)सवाल : आम्ही आमच्या जमिनी का द्यायच्या?प्रलंंबित विकासकामांबाबत प्रकल्पग्रस्तांनीही वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र, त्याला मूर्त स्वरूप आले नाही. अजून काही ठिकाणी प्राथमिक सुविधाही पोहोचलेल्या नाहीत. मग आम्ही कोणत्याही विकासकामांसाठी जमिनी का द्यायच्या? असा सवाल प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.प्रकल्पग्रस्त नाराजगडनदी धरणाचे काम एकीकडे पूर्णत्वास जात असताना दुसरीकडे प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मात्र तशाच आहेत. ‘आधी धरण मग पुनर्वसन’ असे धोरण ठरवणाऱ्या शासनानेच आपले धोरण पायदळी तुडवल्याने प्रकल्पग्रस्त नाराजी व्यक्त करत आहेत.