शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

कारागृह अधिकाऱ्याला शिपायाची मारहाण

By admin | Updated: July 18, 2016 00:03 IST

गुन्हा दाखल : वरिष्ठांकडे तक्रार केल्याचा राग; कारागृहातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

रत्नागिरी : कारागृहात तपासणी सुरू असताना शिपायाने त्याच्याकडील कागदाची पुडी लपवण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण वरिष्ठांना कळवल्याचा राग येऊन त्या शिपायाने तुरुंग अधिकाऱ्याला मारहाण करण्याचा प्रकार रत्नागिरीतील विशेष कारागृहात शुक्रवारी घडला असून, याप्रकरणी पोलिसांनी शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, यामुळे कारागृहातील सुरक्षेचा मुद्दाच पुढे आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथील विशेष कारागृहात युवराज पाटील हा शिपाई म्हणून काम करतो. शुक्रवारी कारागृहाची तपासणी सुरू असताना त्याने त्याच्याकडील पुडी लपवण्याचा प्रयत्न केला. तुरुंग अधिकारी नागनाथ भानवसे यांना याबाबत संशय आल्याने त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली. याचा राग येऊन युवराजने त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी शिपाई युवराजविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, या प्रकारामुळे कारागृहातील सुरक्षेचा मुद्दाच ऐरणीवर आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याला शिपायाकडून मारहाण होत असेल तर उर्वरितांच्या सुरक्षेचं काय? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. (प्रतिनिधी) ‘पुडी’मागे दडलंय काय? - शिपाई युवराजकडे सापडलेल्या पुडीत नेमके काय होते? याचाही तपास पोलिस करणार आहेत. - अद्याप तरी केवळ आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. - युवराजकडे सापडलेल्या ‘पुडी’ प्रकरणाची तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आल्याने या ‘पुडी’ प्रकरणाची चर्चा दिवसभर रंगली आहे. - कारागृहात घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण कारागृहाची सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.