वेंगुर्ले : अप्पर पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी काल, शुक्रवारी रात्री वेंगुर्ले कॅम्प भागातील म्हाडा वसाहतीतील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी आत व बाहेर जुगार खेळणाऱ्या ३0 जणांना १२ लाख ६१ हजार १९३ रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली. जुगार अड्डा चालविणारा शैलेश गुंडू गावडे हा फरार झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन शासकीय अधिकाऱ्यांसह काही राजकीय पदाधिकारीही आहेत. या छाप्यात रोख ८ लाख २४ हजार ४९३ रुपये, आठ दुचाकी, २६ मोबाईल, चार टेबल व सहा खुर्च्या मिळून १२ लाख ६१ हजार १९३ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. वेंगुर्ले शहरातील कॅम्प भटवाडी येथील म्हाडा वसाहतीमध्ये आत व बाहेर हा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांना मिळाली होती. शुक्रवारी रात्री ११ वाजून २० मिनिटांनी अप्पर पोलीस अधीक्षक साहू यांंच्या नेतृत्वाखाली येथील पोलीस निरीक्षक रणजित रजपूत, पोलीस उपनिरीक्षक सरिता लायकर, आर. ए. भोरे, पोलीस कर्मचारी वासुदेव वराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. वेंगुर्ले शहरात दारूचे अड्डे व जुगार सुरू असताना स्थानिक पोलीस अधिकारी व पोलीस याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांतून केला जात होता. शिवसेना व सेना युवा मोर्चातर्फे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित रजपूत यांना निवेदन देऊन हे अवैध धंदे बंद करण्याचे आवाहन केले होते.३0 जणांना अटक, मालक फरारअटक केलेल्यांमध्ये संतोष गुरुनाथ नाईक (वय ३८, वेंगुर्ले राऊळवाडा), जयेश नामदेव दळवी (४०, हॉस्पिटल नाका), शंकर आत्माराम परब (४७, शिरोडा), संदेश लक्ष्मण कोचरेकर (२९, कोचरा), श्रीकृष्ण शंकर भोगटे (४२, दाभोली नाका), राकेश भरत परब ( २२, कॅम्प भटवाडी), गोरख मनोहर शारबिद्रे (४३, माणगाव-कुडाळ), विल्यम फ्रान्सिस बोर्जेस (२४, भटवाडी-सावंतवाडी), बशीर शेख ( ६०, कॅ म्प वेंगुर्ले), रुपेश रमेश सावंत (३२, कॅम्प भटवाडी), रवींद्र आत्माराम सावंत (३५, वजराठ), अमित दिलीप जोशी (२६, कॅम्प भटवाडी), भूषण दिलीप ढवळ (२६, वेंगुर्ले), अंकु श बाबा निकम (३५, वेंगुर्ले कॅम्प), आेंकार विष्णू मुंडये (२५, आडेली), नयनेश्वर वासुदेव हुले (५८, घाडीवाडा वेंगुर्ले), रमेश धाकू निकम (५४, निरवडे), पांडुरंग बापू पवार (५०, खासकीलवाडा, सावंतवाडी), प्रकाश सहदेव देसाई (२७, हळदीचे नेरूर, कुडाळ), लक्ष्मण सदानंद म्हाडदळकर (५२, नेरूर, कुडाळ), सुनील सखाराम म्हाडगूत (३५, हळदीचे नेरूर, कुडाळ), संजय आनंद केरकर (३२, राऊळवाडा वेंगुर्ले), रत्नाकर अनंत मोर्ये (३९, कॅम्प वेंगुर्ले), प्रसाद बाळकृष्ण मराठे ( ३६, कॅम्प वेंगुर्ले), दिलीप मधुकर वेंगुर्लेकर (४०, कविलकट्टा कुडाळ), कमलाकर भिवा सरमळकर (४०, कॅम्प भटवाडी), भरत गणेश परब (५२, कॅम्प भटवाडी), शेखर लक्ष्मण गोळवणकर (४८, कॅम्प भटवाडी), यशवंत भास्कर परब (३८, कॅम्प भटवाडी), सत्यवान महादेव हरमलकर (५0, पिंगुळी, कुडाळ) यांचा सामावेश आहे. या सर्वांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, हा जुगारअड्डा चालविणारा शैलेश गुंडू गावडे (५०, कॅम्प भटवाडी) हा फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)पहिलीच मोठी कारवाईतत्कालीन पोलीस अधीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी सहा वर्षांपूर्वी अवैध धंदेवाईकावर जरब बसविली होती. आता नव्याने आलेल्या पोलीस अधीक्षकांच्या सहकार्यामुळे अप्पर पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी ही मोठी कारवाई केली आहे. यामुळे अवैध धंदेवाल्यांंचे धाबे दणाणले आहेत.अड्डाचालक राजकीय पक्षाशी संबंधितया जुगार अड्ड्याचा मालक एका राजकीय पक्षाच्या स्थानिक नेत्याशी संबंधित आहे. त्या नेत्याचे जिल्ह्यातील अन्य नेत्यांशीही संबंध आहेत. त्यामुळे या अड्ड्यावर कारवाई होईल, असे अड्डा चालकाला अपेक्षित नव्हते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या अन्य अड्ड्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
वेंगुर्लेत जुगार अड्ड्यावर छापा
By admin | Updated: August 17, 2014 00:39 IST