शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मतमोजणी प्रक्रियेची रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 12:25 IST

निवडणुकीचा मतदानाचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर आता दुसऱ्या महत्वाच्या टप्प्याची, मत मोजणीची तयारी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून सध्या सुरू झाली आहे. मत मोजणी १४ फेऱ्यांमध्ये होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ठळक मुद्देमतमोजणी प्रक्रियेची रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरूमत मोजणी १४ फेऱ्यांमध्ये होणार

रत्नागिरी : निवडणुकीचा मतदानाचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर आता दुसऱ्या महत्वाच्या टप्प्याची, मत मोजणीची तयारी जिल्हा प्रशासनाकडून सध्या सुरू झाली आहे. मत मोजणी १४ फेऱ्यांमध्ये होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.२३ एप्रिल रोजी रत्नागिरी - सिंधुदुग मतदार संघात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. या लोकसभा मतदान संघात चिपळूण, रत्नागिरी, राजापूर तसेच कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी अशा सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे.

मतदानानंतर आता दुसऱ्या टप्प्याची म्हणजेच मत मोजणीच्या प्रक्रियेची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी आता या सहाही विधानसभा मतदार संघांतून अधिकारी - कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात येणार आहे.पुढच्या आठवड्यात या अधिकारी - कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. मत मोजणीपुर्वी दोन प्रशिक्षणे घेण्यात येणार आहेत. या प्रशिक्षणाद्वारे प्रत्यक्ष मत मोजणीच्या अनुषंगांने माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे सध्या कर्मचारी नियुक्तीच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू आहे.यावेळीही मत मोजणी १४ फेऱ्यांमध्ये होणार आहे. यावेळी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक मतदार संघातील पहिल्या पाच इलेक्ट्रॉनिक्स व्होटिंग मशीन (इव्हीएम) ची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आठ वाजता मत मोजणीला सुरूवात झाल्यानंतर या सहा मतदार संघातील एकूण ३० मशीन्स तपासल्या जाणार आहेत. त्यामुळे यावेळी मोजणीचा कालावधी अधिक वाढणार आहे.मत मोजणी आता काही दिवसांवरच आली आहे. त्यामुळे मतदानानंतर आता मत मोजणी प्रक्रियाही यशस्वीपणे पार पाडावी, यासाठी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रशासन कामाला लागले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग