शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

श्रींच्या आगमनाची चिपळुणात तयारी

By admin | Updated: August 26, 2014 21:51 IST

विविध कार्यक्रम : १२ हजार ५00 मूर्ती

सुभाष कदम - चिपळूण --ढोल - ताशा वाजायला लागला... गणपती नाचायला लागला... गणपती बाप्पा मोरया... अशा जल्लोषात अवघ्या कोकणवासीयांच्या उत्साहाला उधाण आणणारा गणेशोत्सव शुक्रवारी सुरु होत आहे. यावेळी चिपळूण पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ हजार ६५० गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. चिपळूण शहर परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, वरची खेर्डी, खेर्डी बाजारपेठ, बहादूरशेख नाका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण चिपळूण, कापसाळ पाटबंधारे कॉलनी, श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शिवाजी चौक चिपळूण, नगरपरिषद, भाजी मंडई, वेशीचा मारुती, कोकण रेल्वे, चिपळूणचा राजा - शिवाजी चौक, पोलीस लाईन अशा १३ ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. कोकणात गणेशोत्सवाचे दिवस मंतरलेले असतात. गणेशभक्तांच्या उत्साहाला यावेळी उधाण आलेले असते. घरोघरी चैतन्यमय वातावरण असते. धूप, सुगंधी अगरबत्त्या यामुळे वातावरण प्रसन्न असते. घरोघरी आरती, भजन व गणेशाची गाणी गायली जातात. १७५ दीड दिवसाच्या गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. ५ दिवसांचे ७ हजार २५०, तर अनंत चतुर्दशीपर्यंतच्या ५ हजार २२५ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. यावर्षी मंगळवारी गौर येणार असून, बुधवारी ओवसे आहेत. त्यामुळे नवविवाहिता सज्ज झाल्या आहेत. गुरुवारी ५ दिवसांच्या गणेशाचे विसर्जन होईल. गणेशोत्सव असल्यामुळे बाजारपेठेत गर्दी उसळली आहे. अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प होत आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या भक्तांचे स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी स्वागत कमान्या आहेत. गावोगावी फ्लेक्सचे फलक झळकताना दिसतात. यावर्षी निवडणूक असल्याने गणेश दर्शनासाठी पुढाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त यंदा विविध पुढारी या उत्सवाला भेट देतील, अशी चिन्हे आहेत.