शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाची तयारी

By admin | Updated: December 1, 2014 00:17 IST

जिल्हा परिषद : ४ डिसेंबरपासून शेतकरी मेळाव्यांचे आयोजन

रत्नागिरी : जिल्ह्यात ४ डिसेंबरपासून शेतकरी मेळावे घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये कीटकनाशक हाताळणीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पी. एन. देशमुख यांनी दिली. मेळावा यशस्वी करण्यासाठी कीटकनाशक कंपन्यांचे प्रतिनिधी, विक्रेते, तालुका कृषी अधिकारी, आंबा बागायतदार संघाचे प्रतिनिधी, पंचायत समितीचा कृषी विभाग तसेच शेतकरी, बागायतदार या मेळाव्यांना उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यात ४ डिसेंबरपासून प्रत्येक तालुक्यात मेळावे घेण्यात येणार आहेत. दि. ४ रोजी सकाळी ११ वाजता खेड तालुक्यातील अंजने येथील कान्हेरे सभागृहात आणि गुहागर तालुक्यातील आरे येथील अभिजित भोसले यांच्या बागेत, दि. ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता मंडणगड व दापोली या तालुक्यांसाठी केळशी येथील महावीर भवन येथे आणि चिपळूण तालुक्यातील मालदोली ग्रामपंचायत सभागृहात, दि. ७ रोजी सकाळी ११ वाजता राजापूर तालुक्यातील कशेळी जिल्हा परिषद शाळा क्रमांक १मध्ये, दि. ८ रोजी सकाळी १०.३० वाजता रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई ग्रामपंचायत शेजारील गांगण यांच्या निवासस्थानी, दि. ९ रोजी सकाळी १०.३० वाजता जाकादेवी येथील दत्तकृपा मंगल कार्यालय येथे, दि. १० रोजी सकाळी १० वाजता संगमेश्वर तालुक्यातील तुळसणी ग्रामपंचायतीशेजारी आणि लांजा तालुक्यातील आगवे ग्रामपंचायत शेजारी जोशी यांच्या बागेत हा मेळावा घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात आंबा, काजूचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. मात्र, या पिकावर तुडतुडे, थ्रीप्स अशांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी आंबा, काजूवर औषध फवारणी करण्यात येते. त्यासाठी कीटकनाशक हाताळणीबाबत शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दावण्यात येणार आहे. जिल्ह्यात आंबा, काजूवरील फवारणीसाठी जिल्हा परिषदेने २० लाख रुपयांची कीटकनाशक औषधे खरेदी करुन ती शेतकऱ्यांना देण्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीवरुन आणखी १० लाख रुपयांच्या औषधांची खरेदी करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. आंबा, काजूवर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी विद्यापीठाकडून तांत्रिक मार्गदर्शन औषध फवारणीचे व हाताळणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. त्यासाठी कीटकनाशक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व कृषी समितीचे सभापती सतीश शेवडे यांनी केले आहे. (शहर वार्ताहर)रब्बीची तयारी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आवारातील पिकामध्ये भर पडावी व त्यातून नवे तंत्र वापरात यावे हा हेतू.जिल्ह्यातील शेतकरी मेळाव्यातून प्रबोधनासाठी प्रयत्न करणार. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून प्रयत्न करणार. आंबा, काजू पिकावरोबरच अन्य पिकांच्या उत्पादनासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन. रोगप्रतिबंधात्मक उपायांबाबत प्रयत्न.