शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

कंपनीचा विरोध मावळण्याची शक्यता

By admin | Updated: March 20, 2016 23:52 IST

आशापुरा मायनिंग : दर महिन्याला होणार आरोग्य शिबिर

दापोली : आशापुरा मायनिंग विरोधात केळशी पंचक्रोशीतून जनआंदोलन पेटले असतानाच कंपनीने केळशी पंचक्रोशीतील गरजू रुग्णांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन आज (रविवार) केळशी येथे केले होते. महावीर भवन येथे घेण्यात आलेल्या शिबिराच्या सुमारे अडीच हजार ग्रामस्थांनी लाभ घेतला. कंपनीच्या या शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला असून, यापुढे दर महिन्याला आरोग्य शिबिर घेण्यात येणार असल्याचे कंपनी व्यवस्थापक दीपक शेंडे यांनी सांगितले.यावेळी केळशी पंचक्रोशीतील प्रतिष्ठीत नागरिक गोविंद केळशीकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. भागवत, डॉ. मुळ्ये, डॉ. मोकल तसेच कंपनीचे सहाय्यक महाव्यवस्थापक दीपक शेंंडे, पर्यावरण तज्ज्ञ मनोज शर्मा, निरज गावंडे, संजय सिंग, अविनाश नाईक, वैभव गायकवाड, पवनकुमार, अरविंद मनियार, धर्मंेद्रकुमार, सुकांन्ता दासगुप्ता, अरविंद हरीणखेरे, आशिष गाडगीळ, केळशी सरपंच सुरेंद्र कर्देकर, आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी शिबिरार्थींना कंपनीतर्फे मोफत औषध, चहा, नाष्टा देण्यात आला. केळशी पंचक्रोशीतील अनेक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. सर्व प्रकारच्या आरोग्य तपासणीसह मोफत औषध यावेळी रुग्णांना देण्यात आले.या शिबिराचा केळशी, रोवले, उंबरशेत, आंबवली, चिंचाळी, मांदीवली पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी लाभ घेतला. अनेक गरीब व गरजू कुटुंब या शिबिरात सहभागी झाली होती. अनेक वृद्ध रुग्णांना दापोलीत येणे शक्य होत नाही. अशा वृद्धांना आशापुरा कंपनीच्या या आरोग्य शिबिरामुळे केळशीतच तपासणीसह मोफत औषध उपचारांचा लाभ घेता आला. (प्रतिनिधी)समाधान : ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिरया आरोग्य शिबिरामुळे आम्हाला खूप फायदा झाला. कारण आम्हा ज्येष्ठ नागरिकांना दापोली किंवा इतर ठिकाणी जाणे शक्य नाही. केळशी गावात कंपनीने रुग्णांसाठी घेतलेले आरोग्य शिबिर आम्हाला खूप उपयोगी पडले. या शिबिराचा अनेक ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला. परंतु, कंपनीने ज्येष्ठ नागरिकांना मोफत आरोग्य शिबिराची सोय करुन दिल्याचे समाधान आहे.- गोविंद केळशीकर, ज्येष्ठ नागरिकमला अनेक आजार आहेत. प्रत्येकवेळी दापोलीत जावून तपासणी करुन औषध घेणे शक्य होत नाही. परंतु, कंपनीने घरापर्यंत गाडी पाठवून ज्येष्ठ नागरिक म्हणून तपासणी करुन औषध दिले. त्यामुळे या शिबिराचा चांगला लाभ झाला.- नूरजहाँ गिलगिल,ज्येष्ठ नागरिक.कंपनीने आरोग्य शिबिर यशस्वी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, कंपनी यापुढे स्थानिकांच्या सामाजिक हितासाठी मदतीचा हात पुढे करेल. परंतु, यामध्ये कोणाचाही वैयक्तिक स्वार्थ असू नये. - दीपक शेंडे,सहाय्यक महाव्यवस्थापक