शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

म्हाप्रळ बंदरात दहा संक्शन पंपासह १५ बोटी ताब्यात

By admin | Updated: May 16, 2016 00:37 IST

जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई : ९२ लाखांचा वाळूसाठा जप्त

मंडणगड : नूतन जिल्हाधिकारी प्रभाकर प्रदीप यांनी खेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी चिन्मय पंडित यांच्यासमवेत तालुक्यातील म्हाप्रळ रेती बंदर परिसरात संक्शन पंपाच्या मदतीने सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाविरोधात रविवारी पहाटे तीन वाजता धडक कारवाई केली. या कारवाईत दहा संक्शन पंप, १५ बोटी, तीन डंपर व ९२ लाखांचा वाळूसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी बोटींवर काम करणाऱ्या कामगारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी चिन्मय पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी म्हाप्रळ रेती बंदर परिसरात केलेली कारवाई गुप्त ठेवण्यात आली. यासंदर्भात महसूल विभागासही कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती. रविवारी रात्री ११ वाजता विभागीय पोलिस अधीक्षकांना यासंदर्भात सूचित करण्यात आले. यानंतर बंदोबस्ताच्यादृष्टीने बाणकोट व मंडणगड पोलिस ठाण्यांना यासंदर्भात कळवण्यात आले. जिल्हाधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकारी एका खासगी वाहनाने मंडणगड येथे आले. यादरम्यान कारवाईचा पुढील आराखडा ठरला. एका खासगी मच्छिमारी बोटीने उंबरशेत येथून जिल्हाधिकारी व पोलिस पथकाने तीन वाजण्याच्या सुमारास खाडीच्या मार्गाने कारवाईकरिता म्हाप्रळ येथे प्रयाण केले. यावेळी म्हाप्रळ रेती बंदर येथे म्हाप्रळ आंबेत पुलाखाली संक्शन पंपाने वाळू उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले. याशिवाय काही संक्शन पंप खाडीकिनारी वाळू उपसा करीत असल्याचे निदर्शनास आले. म्हाप्रळ रेती बंदर परिसरात हातपाटीच्या मदतीने वाळू उपसा करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. संक्शनचा वापर हा पूर्णपणे बेकायदा असल्याने घटनास्थळी उपसा करीत असलेले सर्वच पंप कायदेशीर कारवाईच्या फेरीत अडकले. या कारवाईत या होड्यांवर काम करणाऱ्या अनेक कामगारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईसंदर्भात तहसीलदार कविता जाधव यांना विचारणा केली असता, जिल्हाधिकाऱ्यांना आढावा बैठकीत म्हाप्रळ येथीस अवैध वाळू उपशासंदर्भात माहिती मिळाल्याने त्यांनी थेट खाडीपात्रात उतरून कारवाई केल्याची माहिती दिली. दरम्यान, दापोलीचे प्रांताधिकारी जयराम देशपांडे, मंडणगडच्या तहसीलदार कविता जाधव, पोलिस निरीक्षक प्रदीप मिसर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल व पोलिसांच्या पथकाने रविवारी दिवसभर वाळू उपशाविरोधातील कारवाईच्या पंचनाम्याचे सोपस्कार पूर्ण केले़ सायंकाळी उशिरा मंडणगड पोलिस ठाण्यात महसूल विभागाकडून यासंदर्भात फिर्याद दाखल होणार असून, गुन्हा नोंद करण्याचे कामकाज सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. जप्त केलेले दहा संक्शन पंप महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नदीपात्रात बुडवून टाकले असून, बोटी व वाळूसाठा पंचनामा करून म्हाप्रळचे पोलिसपाटील आदेश धाडसे यांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे महसूल विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)