शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

मोरोशीत महिलांशी अश्लील वर्तन

By admin | Updated: May 25, 2016 00:31 IST

गावपुढाऱ्याचा प्रताप : पाणी पेटणार, पोलीस ठाण्यात तक्रार

राजापूर : मोरोशी ग्रामपंचायत कार्यालयात काही गावपुढाऱ्यांनी महिला सदस्यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ करत त्यांच्या वस्त्रांना हात घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मोरोशी ग्रामपंचायतीमधील काही महिला सदस्यांनी राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. पाणी प्रश्नावरून सुरू असलेल्या चर्चेवेळी हा प्रकार घडल्याची माहिती मोरोशीचे सरपंच सरपंच भालचंद्र ऊर्फ रमेश कानडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.मोरोशीची ग्रामसभा मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. मात्र, आवश्यक गणपूर्तीअभावी सभा तहकूब करण्यात आली. त्यावेळी गावातील काही मंडळी सरळ सभागृहात आली व आपल्याला पाणी प्रश्नावरुन चर्चा करावयाची आहे. असे सांगत सरपंच कानडे यांच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली. मोरोशी गावात गेल्या आठ दिवसांपासून मधलीवाडी, कदमवाडी, सोनारवाडी व मिरासवाडी या चार वाड्यांना नळपाणी योजनेतून पाणी पुरवठा सुरु करण्यात आला असून, आणखी चार वाड्यांना पाणी पुरवठा सुरु करावयाचा आहे. मोरोशी गाव हा टँकरग्रस्त गाव असून, पाण्याबाबत उपाययोजना सुरू असतानाच सभेत आलेल्या त्या गाव पुढाऱ्यांनी फक्त मधलीवाडीलाच पाणी पुरवठा करा. उर्वरित वाड्यांना पाणी देऊ नका, असा पवित्रा घेतला.असे होणार नाही, टचाई असणाऱ्या सर्व वाड्यांना मी पाणी पुरवठा करणार आहे, असे सरपंच कानडे यांनी सांगून वाद घालणाऱ्या ग्रामस्थांचे म्हणणे फेटाळून लावले. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयातच वादंगाला सुरुवात झाली. एकमेकांवर शाब्दिक चिखलफेक झाली. उपस्थित महिला सदस्यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न करताच त्या महिलांकडे आपला मोर्चा वळवत त्या गावपुढाऱ्यांनी महिलांना शिविगाळ करायला सुरुवात केली. एवढ्यावर भागले नाही तर महिलांच्या वस्त्रांना हात घालताना त्यांच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असा प्रकारही घडला. या प्रकाराची दखल घेऊन सरपंच कानडे यांनी राजापूर पोलीस ठाण्यात संपर्क साधला. त्यानंतर सर्वजण पोलिसात हजर झाले. गावपुढारी पोलीस ठाण्यात आल्यावर महिला सदस्यांनी आपल्याला कशा पद्धतीने अपमानित करण्यात आले, याची माहिती दिली. (प्रतिनिधी)