मंडणगड : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे अंतर्गत मंडणगड तालुका शाखेतर्फे देशभक्तीपर तालुकास्तरीय गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत पूजा कर्वे हिने प्रथम क्रमांक पटकाविला.
या स्पर्धेचा बक्षीस समारंभ आयोजित करण्यात आला होता. स्पर्धेसाठी एकूण ३८ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. यामध्ये द्वितीय क्रमांक दीपांजली धाडवे, तृतीय क्रमांक युवराज देवघरकर, उत्तेजनार्थ क्रमांक दीपक बागुल, श्रद्धा राजेश जाधव यांना मिळाला. स्पर्धेसाठी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे वरिष्ठ मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे, उपाध्यक्ष शुभांगी काळभोर, फुलचंद नागटिळक, डॉ. अ. ना. रसनकुटे, डॉ. अलका नाईक यांची संमती लाभली. या स्पर्धेसाठी मंडणगड तालुका शाखेचे अध्यक्ष संदीप तोडकर, उपाध्यक्षा संगीता पंदिकर, कार्याध्यक्ष अमोल दळवी, खजिनदार शैलेश शिगवण यांनी मेहनत घेतली. परीक्षक म्हणून डॉ. श्रीधर बाम, पुरुषोत्तम कर्वे, शांताराम पवार यांनी परीक्षण केले. समारंभाचे अध्यक्षस्थान स्वाती विजय भागवत यांनी भूषविले, तर प्रमुख अतिथी म्हणून विनोद जाधव, जयवंत दळवी उपस्थित होते.