शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

मतदान प्रक्रिया शांततेत

By admin | Updated: April 23, 2015 00:39 IST

ग्रामपंचायत निवडणूक : रत्नागिरीत आज मतमोजणी

रत्नागिरी : तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान झाले. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत झालेल्या मतदानाची आकडेवारी ६७.२२ टक्के इतकी आहे. एकूण ८९,०१३ मतदारांपैकी ५९,८३५ मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला. मे ते आॅगस्ट २०१५ पर्यंत मुदत संपणाऱ्या तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यापैकी खरवते येथील ग्रामपंचायतीसाठी एकही अर्ज न आल्याने निवडणुका नव्याने घेण्यात येणार आहेत. आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्याने उर्वरित ४२ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान घेण्यात आले. निवडणूक रिंगणात ७२६ उमेदवार होते. ही निवडणूक ४२ ग्रामपंचायतींच्या १३४ प्रभागांकरिता घेण्यात आली. सध्या उकाड्याचे वातावरण असल्याने सकाळी आणि सायंकाळी उत्साहाने मतदान झाले. सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरूवात झाली. त्यावेळी पहिल्या दोन तासात मतदारांची लांबच लांब रांग दिसून येत होती. दुपारी १२ वाजेपर्यंत मतदानाचा ओघ असाच होता. त्यानंतर हळूहळू तो कमी होत गेला आणि दुपारच्या सुमारास अनेक मतदान केंद्रावर सुनसानी वातावरण होते. सायंकाळी ४ ते ५.३० यावेळेत पुन्हा मतदान प्रक्रियेने वेग घेतला. त्यामुळे प्रत्यक्षात तालुक्यात ६७.२२ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले.तालुक्यातील एकूण १३५ मतदान केंद्रावर घेण्यात आलेले पहिल्या एक तासात कमी होते. त्यानंतर पुढील तीन तासात ते आणखीन वाढले. मिळालेल्या आकडेवारीनुसार, ७.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५१.१५ टक्के इतके मतदान झाले होते, तर ५.३० पर्यंत ६७.२२ टक्के इतके मतदान झाले. एकूण ८९,०१३ मतदारांपैकी पुरूषांची संख्या २८,८४९ इतकी तर महिलांची संख्या ३०,९८६ इतकी आहे. उद्या शहरानजीकच्या कुवारबाव येथे सामाजिक न्याय भवन येथे सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे. (प्रतिनिधी)सार्वत्रिक निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतीचिंंद्रवली, मिरजोळे, खेडशी, सडामिऱ्या, जाकीमिऱ्या, कर्ले, नाचणे, मजगाव, हरचेरी, चांदेराई, कुरतडे, खानू, नाणीज, पाली, दांडेआडोम, वरवडे, पावस, गोळप, भाट्ये, गावखडी, नाखरे, शिवारआंबेरे, डोर्ले, सोमेश्वर, कोतवडे, काळबादेवी, बसणी, जांभरुण, ओरी, नेवरे, गणपतीपुळे, कासारी, नांदिवडे, गडनरळ, कळझोंडी, वाटद, राई, देऊड, आगरनरळ, चाफे, पानवल, हातखंबा.