शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी हालचालींकडे पोलिसांची करडी नजर

By admin | Updated: January 6, 2017 22:58 IST

पोलिस अधीक्षकांची माहिती : तबरेजचे मतपरिवर्तन परदेशात नाही, मुंब्रा येथेच झाले

रत्नागिरी : दापोली तालुक्यातील हर्णे येथील तबरेज तांबे याच्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणपिढी अशा मार्गाकडे वळू नये यासाठी पोलिस सतर्क झाले असून, आवश्यक त्या ठिकाणी करडी नजर ठेवली जात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक प्रणय अशोक यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, ‘इसिस’साठी काम करावे यासाठी मुंब्रा येथे असतानाच तबरेजचे मतपरिवर्तन करण्यात आले होते, असेही ते म्हणाले.जिल्ह्यातील गुन्हेगारीविषयक आढावा घेण्यासाठी प्रणय अशोक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. तबरेज तांबे याच्याप्रमाणे जिल्ह्यातील आणखी काही तरुण इसिसच्या संपर्कात आले आहेत का, असा प्रश्न त्यांना करण्यात आला. प्रणय अशोक यांनी त्याचा इन्कार केला. जिल्ह्यात असे तरुण तयार होऊ नयेत यासाठी पोलिस सतर्क आहेत आणि सर्व घटनांवर, संभाव्य संशयास्पद भागांवर बारीक लक्ष ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे येथील तबरेज तांबे याचे इसिस संघटनेशी संबंध असल्याची माहिती एटीएसच्या पथकाला मिळाली होती. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा एटीएसच्या रडारवर आला होता. एटीएसचे एक पथक हर्णे येथे तळ ठोकून होते. त्यावेळी अनेक गोष्टी या पथकाच्या हाती लागल्या होत्या.तबरेजचे मूळ गाव हर्णे असले तरी गेली अनेक वर्षे तो आपल्या आईवडिलांसमवेत मुंब्रा येथे राहत होता. तो परदेशात असतानाच त्याचे इसिसशी संबंध आले, अशी माहिती आधी समोर आली होती; पण आता त्याच्याशी निगडित बरीच माहिती पुढे येत आहे. मुंब्रा येथे असतानाच्या काळात त्याला इसिसकडे वळविण्यात आले होते. तसाच प्रभाव स्थानिक तरुणांवर होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्ह्यातील तरुणपिढी कोणत्याही मोहात पडून इसिससारख्या संघटनांकडे आकर्षित होऊ नयेत, यासाठी पोलिस बारीक लक्ष ठेवून असल्याची माहिती त्यांनी दिली. (वार्ताहर)