शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

लाच घेताना पोलीस अटकेत

By admin | Updated: January 5, 2017 23:48 IST

लाच घेताना पोलीस अटकेत

रत्नागिरी : अटक न करण्यासाठी व जामीन मिळवून देण्यासाठी दोन हजारांची लाच घेणाऱ्या पोलिस नाईक संदीप गजानन महाडिक (वय ३९, पोलिस वसाहत, रत्नागिरी) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून राधाकृष्ण पोलिस चौकीतच रंगेहात अटक केली. गेल्या दोन दिवसांपासून हा पोलिस कर्मचारी या पथकाच्या रडारवर होता.यातील तक्रारदार हा रिक्षाचालक असून, त्याच्याविरोधात न्यायालयामध्ये एक खटला चालू होता. या रिक्षाचालकाविरुद्ध जामीनपात्र वॉरंट रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याकडून पोलिस नाईक संदीप महाडिक यांच्याकडे देण्यात आला होता. त्यावेळी या रिक्षाचालकालाअटक न करण्यासाठी व जामीन मिळवून देण्यासाठी महाडिक याने रिक्षावाल्याकडे दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यातील एक हजार रुपये त्यांनी घेतले होते. त्यानंतर संदीप याने आणखी एक हजार रुपयांचा तगादा या रिक्षाचालकाकडे लावला. त्यामुळे त्याने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या हवालदाराची तक्रार दोन दिवसांपूर्वी दिली. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून संदीप महाडिक हा पोलिस कर्मचारी या पथकाच्या रडारवर होता.दरम्यान, गुरुवारी सकाळी या पथकाने संदीपसाठी सापळा लावला होता; परंतु तो शासकीय कामासाठी तहसीलदार कार्यालयात गेला होता. त्यामुळे त्यावेळी ताणे बचावला; परंतु सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास संदीपने पुन्हा रिक्षाचालकाकडे पैशासाठी फोन केला. संदीप याला पैसे देण्यासाठी रिक्षाचालक राधाकृष्ण पोलिस चौकीत गेला. त्याचवेळी एक हजार रुपये घेताना रंगेहात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकांच्या जाळ्यात अडकला. त्याला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सतीश गुरव याच्या मागदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सोनवणे, तळेकर, सहायक पोलिस फौजदार शिवगण, कदम, पोलिस हवालदार कोळेकर, सुपल, ओगले, पोलिस नाईक भागवत, वीर, पोलिस शिपाई हुंबरे व नलावडे यांनी केली. (वार्ताहर)