शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरे’त प्रवाशांना धक्काबुक्की

By admin | Updated: May 1, 2016 00:41 IST

तक्रार करुन दुर्लक्ष : एका सीटसाठी मोजावे लागताहेत २०० रुपये; प्रशासनाकडून कारवाईची मागणी

गणपतीपुळे : मुंबई येथील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सुटणाऱ्या कोकणकन्या, मंगळूर, मांडवी, आदी रेल्वे गाड्यांना असणाऱ्या सामान्य डब्यात प्रवाशांना तिकिटाव्यतिरिक्त बसण्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. त्याचबरोबर सामान्य डब्यातून प्रवास करताना धक्काबुक्कीला सामोरे जावे लागत आहे.छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील रेल्वे प्लॅटफॉर्मला गाड्या लागण्यापूर्वीच सामान्य डब्यांमध्ये अनेक तरुण सीटचा ताबा घेतात. प्रवासी डब्यात चढल्यानंतर जवळजवळ सर्वच सीटवर या तरुणांनी ताबा घेतल्याने काही प्रवासी उभ्याने किंवा दरवाजात बसून प्रवास करतात. यावेळी काही प्रवाशांबरोबर लहान मुले, महिला असल्याने नाईलाजास्तव प्रत्येकी २०० रुपये याप्रमाणे संबंधित तरुणांना पैसे दिल्यानंतर सीट बसण्यास दिली जाते. काहीवेळातच बहुतेक प्रवासी हे या तरुणांना पैसे देऊन बसण्यासाठी सीट मिळवतात.या तरुणांबाबत काही प्रवाशांनी परिसरात असणाऱ्या रेल्वे पोलिसांना सांगूनदेखील या बाबीकडे दुर्लक्ष केले जाते. याकडे रेल्वे अधिकारीदेखील जाणूनबुजून दुर्लक्ष करतात का? या प्रकारामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनसवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत रेल्वे पोलीस व रेल्वे प्रशासनाने लक्ष देऊन संबंधित तरुणांवर कारवाई करावी, अशी मागणी रेल्वे प्रवाशांमधून होत आहे. (वार्ताहर)प्रवाशांशी हुज्जत : गाडीत आधीपासूनच जागा अडवून बसतातमुंबई येथून सुटणाऱ्या गाड्यांमध्ये काही तरूण आधीच जागा अडवून बसलेले असतात. प्रवाशांनी आत प्रवेश केल्यावर त्यांच्याशी हुज्जत घातली जात असल्याचे दिसते.गर्दीचा फायदाकोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या सर्वच गाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांना बसण्यासाठी जागा मिळत नाही. या गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांची लुबाडणूक केली जात असल्याचे प्रकार घडत आहेत. याला आळा घालण्याची मागणी होत आहे.