शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

खेळाडूंची खिलाडीवृत्ती असणे आवश्यक

By admin | Updated: November 18, 2014 23:24 IST

ई रवींद्रन : राज्यस्तरीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेचे उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी : खेळाडूंनी राज्यस्तरीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये खिलाडूवृत्तीने खेळून आपला ठसा राष्ट्रीय स्तरावर चमकवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी मंगळवारी येथे केले. सिंधुदुर्गनगरी येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांच्या विद्यमाने जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धांचे उद्घाटन जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार, ध्वज फडकवून व क्रीडा ज्योत पेटवून करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रत्नाकर धाकोरकर, जिल्हा माहिती अधिकारी संध्या गरवारे, जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ, राज्य संघटनेचे उपसचिव डॉ. प्रशांत जगताप, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांच्यासह १४ ते १७ वयोगटातील राज्यातून आलेले शालेय विद्यार्थी व त्यांचे संघ व्यवस्थापक उपस्थित होते.सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी स्वागत केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी ई. रवींद्रन म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. राज्यातील आठ विभागातून आलेल्या शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या सर्व विद्यार्थ्यांचे मी सिंधुुदुर्ग जिल्ह्याच्यावतीने स्वागत करतो. खेळाडूंनी या राज्यस्तरीय स्पर्धेची चमक खिलाडूवृत्तीने दाखवून राष्ट्रीय स्तरावर आपला विभाग व विद्यार्थी चमकेल यादृष्टीने प्रयत्न करावेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनीही या स्पर्धा पाहून आपल्या जिल्ह्यातूनही असे खेळाडू निर्माण व्हावेत असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले. ते म्हणाले, या स्पर्धांमध्ये राज्यातील आठ विभागस्तरावरून या स्पर्धेत १४ ते १७ वर्षांखालील वयोगटातील ५१२ विद्यार्थी त्यांचे संघ व्यवस्थापक सहभागी झाले असून मंगळवारपासून सुरु झालेल्या या स्पर्धा २० नोव्हेंबरपर्यंत होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्याने खिलाडूवृत्तीने खेळावे त्याचबरोबर केंद्र, राज्य, जिल्हास्तरावर राष्ट्रीय स्वच्छता अभियान सुरु आहे त्यास हातभार लावावा असे आवाहनही दीक्षित यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सॉफ्टबॉल संघटनेचे जिल्हा सचिव अजय शिंदे यांनी केले.या खेळाची सुरुवात श्रीफळ वाढवून व टॉस टाकून जिल्हाधिकारी यांनी केली. अमरावती व नागपूर संघांनी प्रथम खेळास सुरुवात केली. (प्रतिनिधी)