शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिकने वाशिष्ठीचा श्वास कोंडला

By admin | Updated: July 20, 2014 22:45 IST

चिपळूण पालिका : गोवळकोटवासीयांच्या आरोग्याला धोका

चिपळूण : शहरातील वाशिष्ठी नदीपात्रात प्लास्टिक कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याच नदीतून गोवळकोट येथील पंप हाऊसद्वारे परिसराला पाणीपुरवठा केला जातो. या कचऱ्यामुळे पाणी दूषित होण्याची भीतीही नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. काही वेळा मटण मच्छी विक्रेते रात्रीच्या वेळी मृत कोंबड्यांचे अवशेष नदीत टाकतात. यापूर्वी त्यांना समज देण्यात आली होती. मात्र, अजूनही हा प्रकार थांबलेला नाही. चिपळूण नगरपरिषदेने प्लास्टिक विरोधी मोहीम गेल्या वर्षभरापूर्वी सुरु केली होती. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीची पिशवी वापरण्यास बंदी घातली आहे. त्याचबरोबर पाणी अथवा अन्य थंड पेयासाठी सध्या प्लास्टिकच्या बाटलीचा वापर वाढत चालला आहे. नगरपरिषद प्रशासनातर्फे शहर व परिसरातील प्रत्येक प्रभागात नियमित घंटागाडी फिरत असते. मात्र, काही वेळा घरातील प्लास्टिक वस्तू या घंटागाडीत न देता रस्त्याच्या बाजूला किंवा गटारात टाकल्या जात आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या प्लास्टिक वस्तू पाण्यातून अन्यत्र वाहत जात आहेत. शहरातील शीव नदी पात्रातील गाळ पावसाळ्यापूर्वी काढण्यात आला आहे. मात्र, या नदीपात्रातही आता कचरा साचू लागला आहे. वाशिष्ठी ही नदी शहर परिसरातून वाहत असून, खेर्डी पंपहाऊस व गोवळकोट पंपहाऊस येथून परिसराला पाणी पुरवठा केला जातो. मात्र, वाशिष्ठी नदीपात्रात (नाईक पुलाजवळ) सध्या प्लास्टिक कचरा पाण्याबरोबर तरंगत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे परिसरातील पाणी दूषित होण्याची भीतीही नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. काही वेळा चिकन विक्रेते पाण्याचा अंदाज घेऊन मृत कोंबड्यांचे अवशेष नदीपात्रात टाकत असून, याबाबत नगरपरिषद प्रशासनाने अद्याप कोणतीच ठोस कार्यवाही केलेली नाही. वर्षभरापूर्वी मृत कोंबड्यांचे अवशेष टाकण्यावरुन काही व्यावसायिकांना बोलावून त्यांची बैठक घेण्यात आली होती. शिवाजीनगर येथील कचरा प्रकल्प या ठिकाणी या कचऱ्याची व्यवस्था केली जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, याबाबत नगर परिषद प्रशासनाने गांभीर्याने उपाययोजना केलेली नसल्याने नदीतील पाणी अशा घटनांमुळे दूषित होत आहे. (वार्ताहर)