शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

परदेशात जाणाऱ्या नागरिकांच्या लसीकरणासाठी नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:21 IST

राजापूर : शहरतील प्रभागनिहाय लसीकरणाच्या यशस्वी मोहिमेनंतर आता नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे यांनी परदेशात नोकरीनिमित्त जाणाऱ्या नागरिक, शिक्षण ...

राजापूर : शहरतील प्रभागनिहाय लसीकरणाच्या यशस्वी मोहिमेनंतर आता नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे यांनी परदेशात नोकरीनिमित्त जाणाऱ्या नागरिक, शिक्षण व प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाचे विशेष नियोजन केले आहे. अशा नागरिक व विद्यार्थ्यांनी थेट नगराध्यक्षांना संपर्क साधून आपली नावनोंदणी करावी, अशी माहिती नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे यांनी दिली आहे.

राजापूर शहरातील नागरिकांसाठी प्रभागनिहाय लसीकरण मोहिमेचे यशस्वी नियोजन करून शहरातील सर्वच प्रभागांतील ज्येष्ठ नागरिक, महिलांना त्या त्या केंद्रावर लस उपलब्ध करून देत नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे यांनी नियोजन केले आहे. शहरातील आठही प्रभागांत राजापूर नगर परिषद व राजापूर ग्रामीण रुग्णालय व आरोग्य विभागाच्या सहकार्यातून ही लसीकरण मोहीम सुरू असून, नागरिक त्याचा लाभ घेत आहेत.

परदेशात नोकरी करणारे नागरिक व शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांना परत जावयाचे असल्यास त्यांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. त्यांना तत्काळ लस मिळावी या हेतूने पहिला डोस आणि दुसरा डोस लसीकरण मोहिमेचे विशेष नियोजन नगराध्यक्ष अ‍ॅड. खलिफे यांनी केले आहे.

नागरिकांनी आपला पासपोर्ट, व्हिसा कॉपी, आधारकार्ड किंवा पॅनकार्डची झेरॉक्स जोडून लसीकरणासाठी नगर परिषदेकडे अर्ज करावयाचा आहे. त्यानंतर तत्काळ अशा नागरिकांसाठी विशेष शिबिर घेऊन त्यांना लस दिली जाणार आहे, असे अ‍ॅड. खलिफे यांनी सांगितले.