शिशुवाटिकेत चर्चासत्र
दापोली : दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित विद्याभारती शिशुवाटिका व प्राथमिक विभागात कोरोना समज - गैरसमज व मुलांचे आरोग्य संगोपन या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. उमेश रेवाळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. समीर परांजपे यांनी कोरोना विषाणू व उपाययोजना याबाबत माहिती दिली.
लसीकरण मोहीम
चिपळूण : प्राथमिक आरोग्य केंद्र कापरे येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली. एकाच दिवशी ६०० जणांना लसीकरण करण्यात आले. पोसरे, गोंधळे, हनुमान गाव, कालुष्टे, मालदोली, गांगरई आदी सहा ठिकाणी लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते.
प्रशासन नियुक्ती
दापोली : तालुक्यातील ४१ विविध कार्यकारी सेवा संस्थांपैकी आडे-पाडले, आंजर्ले आणि अडखळ या तीन संस्थांवर प्रशासकीय नियुक्ती करण्यात आली आहे. ४१ संस्थांच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे. शासनस्तरावर ऑक्टोबरनंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
विजेचे खांब बदलले
राजापूर : तालुक्यातील शिवणे खुर्द परिसरातील ११ विजेचे खांब बदलण्यात आले आहेत. गेली अनेक वर्षे वीजखांब न बदलण्यात आल्याने जीर्ण होऊन धोकादायक बनले होते. ११ पैकी सहा खांब भटवाडी येथील बदलण्यात आले आहेत. उर्वरित विजेते खांब बदलण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.