शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलपंपाची जागा ताब्यात घेणार?

By admin | Updated: October 27, 2014 23:33 IST

करार संपला : नगरपरिषद प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष

चिपळूण : जीवनावश्यक वस्तूंबरोबरच पेट्रोल, डिझेलची गरज ओळखून चिपळूण नगर परिषद प्रशासनातर्फे ९९ वर्षांच्या करारावर मार्कंडी येथील जागा एका पेट्रोल पंपासाठी भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. करार संपल्यानंतर २०११ मध्ये तीन वर्षांच्या करार वाढवून देण्यात आला होता. हा करारही ३० सप्टेंबर रोजी संपल्याने संबंधित जागा ताब्यात घेण्याबाबत हालचालीना वेग आला आहे.नगर परिषदेच्या आर्थिक व्यवहारामध्ये अधिक भर पडावी, या हेतूने नगर परिषद मालकीच्या काही जागा या करारावर देण्यात आल्या आहेत. यामध्ये मार्कंडी येथील एका पेट्रोल पंपाचा समावेश आहे. पेट्रोलपंप व्यवस्थापकांकडून दरमहिन्याला ठरलेले भाडे मिळण्यास दिरंगाई होत असल्याने त्याचा फटका नगर परिषद प्रशासनाच्या तिजोरीवर होत आहे. विविध कराच्या माध्यमातून नगर परिषद अत्यावश्यक सेवेसह आर्थिक उत्पन्न वाढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहे.मार्कं डी येथील पंप व्यवस्थापक शर्ती, अटींचे पालन करीत नाहीत, असाही ठपका ठेवण्यात आला आहे. ९९ वर्षाच्या करारानंतर ३ वर्षाचा करार २०११ पर्यंत करण्यात आला होता. हा करारदेखील संपल्याने पुढील करार ३० सप्टेंबर २०१४ रोजी संपत असून, याबाबतची नोटीस पाठविण्यात आली आहे. पेट्रोलपंपाच्या व्यवस्थापनाकडून ९ महिन्यांचे थकीत भाडे ४५ हजार रुपये नगर परिषदेच्या वसुली विभागाकडे जमा झाले असून, कराराची मुदत संपल्याने जागा खाली करण्याची नोटीस धाडण्यात आली आहे. अंदाजे २० ते २५ गुंठे जागेत हा पंप विस्तारलेला आहे. मुदतीत जागा खाली करण्यात आली नाही तर पोलीस बंदोबस्तात पंपाची जागा ताब्यात घेण्याची तयारी नगर प्रशासनाने केली आहे. कारवाई करण्यासाठी पोलीस संरक्षण मिळावे, यासाठीही पत्रव्यवहार सुरु आहे. मात्र, सर्वसाधारण सभेत चर्चा झाल्यानंतरच याबाबतचा निर्णय होणार आहे. यानिमित्त या विषयाकडे लक्ष लागले आहे.गेल्या कित्येक वर्षांनंतर या भागातील पेट्रोल पंपाबाबत पालिकेने नोटीस बजावल्याने आजूबाजूच्या परिसरात असलेल्या गाळेधारकांचेही धाबे दणाणले आहे. (वार्ताहर)