श्रीकांत चाळके - खेड -लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस बळ उपलब्ध होत नसल्याने नागरिकांच्या संरक्षणावर अनेक मर्यादा येऊन पडल्या आहेत. ब्रिटिशकालिन पोलीस बळ आजही कायम असल्याने सुरक्षेच्या प्रश्नावर आपण खूप मागे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सन २००१मध्ये लोकसंख्येची घनता २०७ प्रतिचौरस किलोमीटर होती, तर २०११च्या जनगणनेनुसार २५३६ प्रतिचौरस किलोमीटर इतकी झाली आहे. १९९१ ते २००१ या दशकात लोकसंख्या वाढीचा वेग ९.८१ टक्के होता, तर २००१ ते २०११ या दशकात हा वेग (-) ४.९६ टक्के इतका झाला आहे. २००१च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १६,९६,४८२ इतकी होती. यामध्ये पुरूषांची संख्या ७,९४,४३१ इतकी, तर महिलांची संख्या ९,0२,०५१ इतकी होती. याचा अर्थ दर हजार पुरूषांमागे महिलांची संख्या ११३६ इतकी होती. घरांची संख्या ३,७७,३६७ होती. जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील खेड्यांची संख्या १४५३ आहे. १० वर्षांनंतर २०११ साली झालेल्या जनगणनेनुसार रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्या १६,१५,०६९ इतकी झाली, तर घरांच्या संख्येत २० हजारांनी वाढ होऊन ती ३,९७,११५ इतकी झाली आहे. पुरूषांची संख्या ७,६१,१२१ आणि महिलांची संख्या ८,५३,९४८ झाली आहे. त्यानुसार एक हजार पुरूषांमागे महिलांचे प्रमाण ११२३ इतके झाले असले तरी हे प्रमाण गेल्या दशकापेक्षा कमी आहे.नऊ तालुक्यांमध्ये खेड, दापोली, रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर तालुक्यांची लोकसंख्या १ लाखापेक्षा अधिक आहे, तर एकट्या मंडणगड तालुक्याची लोकसंख्या १ लाखापेक्षा कमी आहे़ जिल्ह्यातील १७१ गावांमध्ये पाणीटंचाईची झळ पोेहोचते. १५०९ खेड्यांमध्ये बारमाही रस्ते आहेत. ३१ गावांमध्ये केवळ आठमाही रस्ते आहेत. पिण्याच्या पाण्याची सुविधा केवळ १२६८ गावांमध्ये उपलब्ध आहे. जिथे घर तिथे शौचालय ही शासनाची घोषणा असली तरीही जिल्ह्यातील १२१७५६ कुटुंबांपैकी १ लाख २० हजारांच्या आसपास कुटुंबांकडे शौचालये आहेत. मात्र, २१११ कुटुंबियांकडे शौचालये नाहीत. मात्र, ही कुटुंब सार्वजनिक शौचालयांचा वापर करीत असल्याचे कागदोपत्री दाखवले जात आहे. पूर्वीचेच पोलीस बळ कायम असल्याने अनेक ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न पुढे येत आहे, शासनाने याकडे लक्ष द्यावे. कमी लोकसंख्या मंडणगडची चिपळूण आणि लांजामध्ये प्रत्येकी १, तर राजापूर तालुक्यात २ आणि संपूर्ण जिल्ह्यात एकूण ४ गावे ओसाड आहेत. त्यांना महसुली गावांचा दर्जा देण्यात आला आहे. जिल्ह्यात १०२२ नागरिकांमागे १ पोलीस वाटणीला येतो, तर २५४७ नागरिकांमागे १ दवाखाना असे सध्या प्रमाण आहे. २६०५० नागरिकांमागे १ न्यायालय असून, जिल्हाभरात २१११ कुटुंबांकडे अद्याप शौचालये नाहीत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी शौचालये नसल्याचा परिणाम तेथील स्वच्छता व नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. शासकीय योजना केवळ कागदावरच रंगवल्या जात असून, अशा योजनांच्या अंमलबजावणीकडे लक्ष हवे. ठिकाण लोकसंख्यापुरुष महिला खेडी मंडणगड ६२,१२३२७.९९०३४,१३३१०९दापोली १७८,३४२८२,८१७९५,५२३१७६खेड१,८१ ६१५८६,,४८५९५,१३०२१५चिपळूण २,७९,१२२१,३४,७८८ १,४४,३४४१६५गुहागर१,२३,२०९५४,६९६६८,५१३१२१रत्नागिरी ३,१९,४४९१,५५,५७५१,६८८७४१९९ संगमेश्वर १,९८,३४३९२,७९११़,०५,५५२१९८लांजा१,०६,९६६४९,९८५५७००११२२राजापूर१,६५,८८२७५,९९४८९,८८८२३८
लोक वाढले, पोलीस तेवढेच
By admin | Updated: June 27, 2015 00:20 IST