शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
4
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
5
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
6
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
7
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
8
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
9
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
10
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
11
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
12
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
13
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
14
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
15
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
16
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
17
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
18
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
19
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
20
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...

थिबाकालीन बुद्धविहारचा प्रश्न प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2015 00:03 IST

सात वर्षांचा प्रश्न : बुद्धिस्ट सोसायटीकडून होणारी ३८ गुंठ्यांची मागणी दुर्लक्षित

रत्नागिरी : सध्याच्या उत्पादन शुल्क कार्यालयाच्या शेजारी असणाऱ्या थिबाकालीन बुद्धविहाराच्या जागेचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडियाच्या येथील शाखेतर्फे गेल्या सात वर्षांपासून ३८ गुंठे जमिनीच्या मागणीला आजतागायत वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. जागेचा प्रश्न अनिर्णित असल्याने या बुद्धविहाराची दुरवस्था होत आहे.बुद्धपुजा करता यावी, या उद्देशाने सध्या ज्या जागेवर उत्पादन शुल्क कार्यालय आहे, त्याच्या शेजारी थिबा राजाने रत्नागिरीत छोटेसे विहार उभारले होते. थिबा राजानंतर हे बुद्धविहार उपेक्षितच राहिले होते. या ठिकाणी छोटीशी बुद्धमूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. अतिशय कलाकुसरीने तयार केलेली ही मूर्ती छत नसल्याने उन्हाळा, पावसाळा सोसत या ठिकाणी उभी आहे. आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती अशा दिवशी बौद्ध संघटनांच्या वतीने इथे कार्यक्रम होतात. त्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात मंडप उभारला जातो. या ठिकाणी चांगल्या प्रकारे बुद्धविहार उभारता येईल, या उद्देशाने बुद्धिस्ट सोसायटीच्या येथील समितीने हे बुध्दविहार ताब्यात देण्याची मागणी केली होती, ती मान्यही झाली होती.सध्या या शासकीय जागेत उत्पादन शुल्क कार्यालय आहे. त्यामुळे या जागेचा प्रश्न अडकून पडला आहे. मात्र, या बुद्धविहारासह आसपास असलेली ३८ गुंठे जमिनीची मागणी बुध्दिस्ट सोसायटी आॅफ इंडियाच्या येथील समितीने सातत्याने केली होती. मध्यंतरीच्या काळात यापैकी पंधरा गुंठे जमीन समितीला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही घोषणा २००८ मध्ये करण्यात आली होती. मात्र, याला आता सात वर्षांचा कालावधी उलटला तरीही याबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. या जागेचा प्रश्न अजूनही धसास लागत नसल्याने थिबा राजाचे स्मारक असलेल्या या बुद्धविहाराचीही दुरवस्था होऊ लागली आहे. त्यामुळे समितीने आता पुन्हा जोरदार मागणी करण्यास सुरूवात केली आहे. आतातरी जिल्हा प्रशासनाने याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी समितीतर्फे करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)या बुद्धविहाराची जागा आमच्या ताब्यात द्या, ही मागणी आम्ही गेल्या सात वर्षांपासून जिल्हा प्रशासनाकडे करत आहोत. थिबाकालीन हे बुद्धविहार म्हणजे बौद्ध समाजाची अस्मिता आहे. समितीकडे ही जागा सुपूर्द केल्यास या जागेवर मोठी वास्तू उभी राहू शकेल. या ठिकाणी चांगले कार्यक्रम होऊ शकतील. यासाठी आम्ही आता पुन्हा पाठपुरावा करण्यास सुरूवात केली आहे.एल. व्ही. पवार, अध्यक्ष - दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया, शाखा रत्नागिरी