शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

म्हाप्रळच्या दोन वाळूमाफियांना दंड

By admin | Updated: November 18, 2014 23:22 IST

महसूल खाते : धडक कारवाईत ७७ ब्रास वाळूचा अनधिकृत साठा जप्त

मंडणगड : मंडणगड तहसील कार्यालयाच्यावतीने मंगळवारी म्हाप्रळ येथे वाळू माफियांच्या विरोधात केलेल्या धडक कारवाईत एक सक्शन पंप ताब्यात घेऊन पाण्यात बुडवण्यात आला. तसेच ७७ ब्रास वाळूचा अनधिकृत साठा केल्याप्रकरणी दोघांविरोधात ७७ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.यासंदर्भात तहसील कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार म्हाप्रळ येथे खाडीपात्रात अनधिकृत वाळूउपसा सुरु असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार वाळू उपशाविरोधात कारवाई करण्यासाठी मंगळवारी सकाळी तहसीलदार कविता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल कर्मचाऱ्यांचे पथक रवाना झाले होते.या पथकाने म्हाप्रळ रेती बंदर या ठिकाणी केलेल्या कारवाईत उमर मुकादम यांच्या प्लॉटजवळ १ सक्शन पंप ताब्यात घेऊन पाण्यात बुडवण्यात आला़ मुकादम यांच्या प्लॉटवर ५५ ब्रास वाळूचा साठा आढळून आला. वाळूचा अनधिकृतपणे साठा केल्याने मुकादम यांच्यावर ५५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली़ याचबरोबर नियाज मांडलेकर यांच्या प्लॉटवर २२ ब्रास वाळूचा अनधिकृत वाळूसाठा आढळून आला. त्याच्याविरोधात २२ हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली. महसूल विभागाने केलेल्या कारवाईत निवासी नायब तहसीलदार विकास गारुडकर, सर्कल, तलाठी ए. के. पवार आदींच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, सक्शनच्या मदतीने वाळू उपसा करण्यासाठी राज्यात कोठेही परवानगी नसताना म्हाप्रळ येथे सक्शन पंपाच्या मदतीनेच वाळूउपसा होत असल्याचे वेळोवेळी सिध्द झाले आहे. ही बाब उघड होऊनही येथील महसूल विभाग संबंधितांविरोधात फौजदारी कारवाई करण्यास धजावत नाही. त्यामुळे एकूणच ही कारवाई दिखाऊ असल्याचा सर्वसामान्य जनतेचा समज असल्याने प्रशासनाबाबत नाराजीचे वातावरण आहे़ (प्रतिनिधी)दोघांना ७७ हजार रुपयांंचा दंड.तहसीलदार कविता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कारवाई.अनधिकृत वाळूसाठा केल्याने मुकादम यांना ५५ हजारांचा दंडनियाज मांडलेकर यांना २२ हजाराचा दंड.