शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; मसूद अजहरनं बहिणीवर सोपवली जबाबदारी
2
'पीएम मोदी गोष्टी लपवतात; ट्रम्प त्या उघड करतात', रशियन तेल खरेदीवरुन काँग्रेसचे टीकास्त्र
3
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
4
‘निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आमदारांना निधीच्या रूपात वाटली जातेय खैरात’, काँग्रेसचा आरोप
5
मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
6
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
7
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
8
अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
9
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
10
फ्रान्सच्या संग्रहालयात 'धूम' स्टाईल चोरी; ८०० कोटींचे दागिने घेऊन चोर फरार; ७ मिनिटांत झाला 'गेम'
11
आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...
12
Neeraj Chopra Lieutenant Colonel : राजनाथ सिंह अन् सेनाप्रमुखांकडून 'गोल्डन बॉय'चा सन्मान (VIDEO)
13
अंतर्गत मतभेदांदरम्यान टाटा ट्रस्ट्सनं वेणू श्रीनिवासन यांची आजीवन विश्वस्त म्हणून केली नियुक्ती; आता मेहली मिस्त्री यांच्यावर नजर
14
मोठी बातमी! सोन्या-चांदीचा बुडबुडा फुटला....! एकच झटक्यात सोनं 3725 तर चांदी 10549 रुपयांनी स्वस्त! जाणून घ्या कारण
15
भारी! WhatsApp, Instagram चॅटिंग होणार सुरक्षित; स्कॅम रोखण्यासाठी मेटाने आणलं नवीन टूल
16
कोट्यवधींचं घबाड! १ कोटी कॅश, लाखोंचे दागिने, ८५ ATM; चहावाल्याचा पर्दाफाश, पोलीस हैराण
17
फ्लॅटमध्ये लिव्ह-इनमध्ये राहत होतं जोडपं, दिवाळीच्या दिवशी दुर्गंधी आल्यानं उघडला तर...; दृश्य पाहून सगळेच हादरले
18
हिऱ्याच्या खरेदीपूर्वी ‘हे’ चार नियम माहीत करून घ्या! कट, क्लॅरिटी, कलर, कॅरेटचा फॉर्म्युला काय सांगतो?
19
भारताच्या 'या' स्कीममुळे शेजारी चीनला लागली मिरची; तक्रार घेऊन पोहोचला WTO च्या दरबारी
20
बदल्याची आग! "माझ्यासोबत तुझी बहीण पळून..."; टोमण्यांना कंटाळला, घेतला तरुणाचा जीव

विनामास्क आढळणाऱ्यांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:31 IST

चिपळूण : शहरासह बाजारपेठेत तसेच तालुक्यात विविध भागात विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलीस बारीक ठेवून आहेत. सध्या कोरोनाचा दुसरा टप्पा सुरू ...

चिपळूण : शहरासह बाजारपेठेत तसेच तालुक्यात विविध भागात विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलीस बारीक ठेवून आहेत. सध्या कोरोनाचा दुसरा टप्पा सुरू असून याचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. त्यासाठी विनामास्क आढळणाऱ्यांना ५०० रुपये दंड आकारण्यात येत आहे. पोलिसांनी अनेकांना दंड केला आहे.

आठवडा बाजारांवर संक्रांत

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने त्याचा परिणाम आठवडा बाजारांवर झाला आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्ह्यातील अनेक आठवडाबाजार बंद करण्यात आले आहेत. या भागातील वार्षिक यात्रोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रमही न करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.

शेतकरी, बागायतदारांचे नुकसान

राजापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या चौपदरीकरणात अनेक ठिकाणी संबंधित यंत्रणेने अतिक्रमण करीत अतिरिक्त भूसंपादन केल्याने अनेक शेतकरी, बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबत जमीनमालकांकडून असंख्य तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. मात्र, जादा जमिनीचा मोबदला देण्यासाठी शासनाकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याने तीव्र नाराजी पसरली आहे.

कामगिरी चोखपणे पार पाडण्याची गरज

लांजा: अनेक शासकीय योजना ग्रामपंचायतीपर्यंत येतात; पण त्या ग्रामस्थांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे नव्या सदस्यांनी प्रत्येक शासकीय योजना घराघरांत पोहोचविण्याची कामगिरी चोखपणे पार पडल्यास प्रत्येक गावचा विकास होणार आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीचे सदस्य, उपसरपंच आणि सरपंच यांनी प्रयत्न करावेत.

विकास कामांचा सपाटा

दापोली : वांझळोली बौद्धवाडी ते गावठवाडी रस्ता डांबरीकरण करणे, ग्रामपंचायत संरक्षण भिंत बांधणे, आदी कामांचा भूमिपूजन सोहळा माजी आमदार संजय कदम यांच्या उपस्थितीत नुकताच झाला. यावेळी वांझळोली ग्रामपंचायत सरपंच नितीन दुर्गावळे, राष्ट्रवादीचे गणअध्यक्ष नितीन कोठारी, युवक तालुकाध्यक्ष नीलेश तांबे, डॉ. दिलीप तांबे, बुद्धविहार कमिटीचे अध्यक्ष सुरेश अहिरे, आदी उपस्थित होते.

मासेमारी व्यवसाय तोट्यात

रत्नागिरी : किनारपट्टीवरील मासेमारी व्यवसाय हा जिल्ह्याचा आर्थिक कणा मानला जातो. चालू मासेमारी मोसमामध्ये माशांची आवक कमी झाल्याने मच्छीमार हैराण झाले आहे. डिझेलचाही खर्च भागेनासा झाला आहे आहे. त्यामुळे मासेमारी व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला आहे.

फळ विक्रेत्यांकडून फसवणूक

रत्नागिरी : शहर परिसरातमध्ये अनेक फळ विक्रेते हातगाड्यांवरून फिरताना दिसतात. या हातगाड्यांवरील फळे विकणाऱ्यांकडून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याची ओरड सध्या सुरू आहे. सफरचंद विकताना सुकलेली व कमी प्रतीची विकली जात असतानाच भावही जास्त घेतला जात असल्याने ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

उद्यमनगर परिसरात विजेचा लपंडाव

रत्नागिरी : शहरालगतच्या शिरगांव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील उद्यमनगर परिसरामध्ये गुरुवारी ५ वाजल्यापासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. दुपारी पुन्हा वीजपुरवठा अचानक बंद झाला होता. आधीच उकाडा होत असल्याने वीजपुरवठा बंद असल्याने उकाड्याने लोक त्रस्त झाले होते.