चिपळूण : वाहतुकीचा परवाना नसताना दुचाकी भरधाव वेगाने चालवून एका पादचाऱ्यास धडक देऊन त्याला जखमी केल्याची घटना डेरवण ते सावर्डे रस्त्यावर काही दिवसांपूर्वी घडली आहे. या प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय जयराम धावडे (३२, रा. सावर्डे-काजरकोंडवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
या अपघातात लक्ष्मण विठ्ठल कातकर (६२, रा. सावर्डे-काजरकोंड) हे जखमी झाले आहेत. याबाबतची फिर्याद सुरेंद्र सदाशिव कदम (सावर्डे पोलीस स्थानक) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धावडे याच्याकडे दुचाकी चालवण्याचा परवाना नसताना तो ४ एपिल रोजी आपल्या ताब्यातील दुचाकी काजरकोंड ते डेरवण-हडकणी फाटा असे सावर्डे रस्त्याने बेदरकारपणे चालवत हाेता. डेरवण ते सावर्डे रस्त्यावर कातकर हे चालत जात असताना धावडे याने त्यांना धडक दिली. यात ते जखमी झाले आहेत.