शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

देशभ्रतार यांची पुण्याला बदली

By admin | Updated: March 3, 2016 00:04 IST

जिल्हा परिषद : अविश्वास ठरावावरील चर्चेआधीच निर्णय

रत्नागिरी : शिवसेनेने फारच प्रतिष्ठेचा प्रश्न करून दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर चर्चा होण्याआधीच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या अविश्वास ठरावावर महिला दिनीच ८ मार्चला बैठक बोलावण्यात आली आहे. मात्र, आता या बदलीमुळे बैठकीतील हवाच गेली आहे.देशभ्रतार यांनी दि. ९ एप्रिल २०१५ रोजी रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा पदभार स्वीकारला होता. जिल्हा परिषदेच्या कामात सुसूत्रता आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र, विकासकामांच्या मुद्द्यावरून तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर व पदाधिकाऱ्यांशी नेहमीच खटके उडत होते. काही कामांमध्ये देशभ्रतार यांनी काटेकोरपणा आणल्यामुळे हे खटके उडाल्याची माहिती पुढे येत आहे. त्यावेळी राजापकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्याकडे याबाबत तक्रारी केल्या होत्या. दरम्यानच्या कालावधीमध्ये शिवसेनेचे संपर्कप्रमुख विजय कदम यांनी देशभ्रतार यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याची घोषणा केली होती. शिवसेनेने हा प्रश्न प्रतिष्ठेचा केला असला तरी भाजप व राष्ट्रवादीने मात्र यातून दूर राहणे पसंत केले होते. आठवडाभरापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या वेळी अचानक सर्वपक्षीय सदस्य एकत्र येऊन देशभ्रतार यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेऊन विशेष सभेची मागणी केली. त्याप्रमाणे अविश्वास ठरावासाठी ८ मार्चला नूतन अध्यक्ष तुकाराम तथा बुवा गोलमडे यांनी सभा बोलावली आहे.काल मंगळवारी अचानक देशभ्रतार यांच्या बदलीबाबत मंत्रालय स्तरावर हालचाली सुरू होत्या. त्यानंतर बुधवारी सायंकाळी उशिरा त्यांच्या बदलीचे आदेश जिल्हा परिषदेत येऊन थडकले. त्यांची बदली पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती होणार, हे मात्र जाहीर झाले नव्हते. (शहर वार्ताहर)