खेड : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने खासगी वाहतुकीसाठी २२ एप्रिल २०२१ पासून नवीन नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीची रात्री ८ वाजल्यापासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली. त्यानंतर नियम डावलून प्रवासी वाहतूक केल्याप्रकरणी मुंबई - गाेवा महामार्गावरील भरणे नाका येथे कारवाई करण्यात आली. या कारवाईत १ लाख ६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
निर्बंधांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी दि. २२ रोजी रात्री ११ ते दि. २३ रोजी पहाटे ५ या कालावधीत भरणे नाका येथे पोलिसांनी नाकाबंदी केली होती. कोविड-१९ चे नियम डावलून प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी प्रवासी आरामबसवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये १०६ जणांवर १ हजार रुपयेप्रमाणे दंड आकारण्यात आला. त्यासोबतच अन्य एका वाहनचालकाकडून ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पाेलीस निरीक्षक सुजित गडदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदकुमार घाणेकर, पोलीस कॉन्स्टेबल निलेश माने, किरण चव्हाण, अरविंद जमदाडे, रूपेश जोगी, सुशांत नरले व गृहरक्षक दलातील जवान यांनी केली.
.........................................
khed-photo233 नियम डावलून प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी प्रवासी वाहनांवर खेड पाेलिसांनी भरणे नाका येथे कारवाई केली.