शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठांना उड्डाणपूलाचा पर्याय

By admin | Updated: August 24, 2014 00:37 IST

टोलमुक्त महामार्गाची मागणी मान्य : विनायक राऊत

रत्नागिरी : महामार्ग चौपदीकरणाच्या कामामुळे बाजारपेठा उध्वस्त होऊ नयेत, यासाठी सहा बाजारपेठांच्या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत़ महामार्गाचे काँक्रिटीकरण आणि टोलमुक्त या दोन्ही मागण्या केंद्र शासनाने मान्य केल्याचे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़यावेळी माजी आमदार बाळ माने, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडीक, भाजपा जिल्हाप्रमुख सचिन वहाळकर, तालुकाध्यक्ष बंड्या साळवी, पंचायत समिती सभापती अनुष्का खेडेकर उपस्थित होत्या. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते महामार्गाचे निवळी येथे सप्तलिंगी नदीवरील पुलाच्या कामाचा आणि मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा शुभारंभ रविवारी होणार आहे. त्यानिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ ते पुढे म्हणाले की, चौपदरीकरणाच्या प्रकल्पामध्ये लोकांचा सहभाग आणि कमीत कमी विस्थापन, अशी भूमिका समोर ठेवूनच हे काम सुरु करण्यात येत आहे.ते पुढे म्हणाले की, महामार्गाचे चौपदरीकरणासाठी मागील वर्षी झालेल्या सर्वेक्षणाप्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात आले नव्हते़ चौपदरीकरणामध्ये रोहा, चिपळूण, लांजा, पाली, कणकवली, संगमेश्वर या बाजारपेठा उध्वस्त होऊन व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त करतानाच राऊत यांनी पाली, लांजा कणकवली या बाजारपेठांच्या ठिकाणी उड्डाणपूलासाठी तरतूद करा, अशी मागणी केली होती़ ती मान्य झाली असून आणखी चिपळूण, राजापूर, तळेरे या बाजारपेठेतही उड्डाणपूलाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले़ते पुढे म्हणाले की, खेड, कणकवली, कुडाळ येथे महामार्गाच्या चौपदरीकणासाठी भूसंपादनाचे काम सुरु केले आहे़ त्यामध्ये निवृत्त अधिकाऱ्यांचे योगदान घेण्यात येत असून त्यासाठी वेगळे मानधनाची तरतूद करण्यात आली आहे़इंदापूर ते झाराप रस्त्याच्या चौपदरीकरणाचे पहिल्या टप्प्याचे काम संथगतीने सुरु आहे़ कारण येथील भूसंपादनाची कार्यवाही व्यवस्थित झालेली नसल्याची खंतही व्यक्त करतानाच त्याप्रमाणे चुका होऊ नये, यासाठी यावेळी दक्षता घेण्यात आली असल्याचेही खा़ राऊत यांनी स्पष्ट केले़ चौपदरीकरणाचे काम पाच टप्प्यांमध्ये करण्यात येणार होते़ मात्र, आता ते आठ टप्प्यांमध्ये करण्यात येणार असून हे काम २०१७ सालापर्यंत पूर्ण होणार असल्याचे राऊत यांनी यावेळी बोलताना सांगितले़ (शहर वार्ताहर)