शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

बागायतदारांना विम्याचा पर्याय

By admin | Updated: November 17, 2014 23:51 IST

आंबा-काजूला धोका : गतवर्षीच्या नुकसानग्रस्तांना पावणेतीन कोटींची भरपाई

रत्नागिरी : अवेळी पाऊस, उच्चत्तम तापमान व नीचांकी तापमान यामुळे आंबा व काजूच्या पिकावर परिणाम झाल्याने होणारे नुकसान लक्षात घेता शासनाने कृषी विभागाच्यावतीने हवामानावर आधारित पथदर्शक फळपीक विमा योजना सुरू केली. या योजनेंतर्गत गतवर्षीच्या १०२४ शेतकऱ्यांना २ कोटी ७३ लाख ५५ हजार ९३२ रूपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे.शासनातर्फे कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यात २०११-१२ पासून फळपीक विमा योजना सुरू करण्यात आली. अवेळचा पाऊस, कमी तापमान, जास्त तापमान या निकषावर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येते. २०१३-१४ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील १४५७ आंबा बागायतदारांनी विमा योजनेचा लाभ घेतला होता. मात्र, १०२४ शेतकऱ्यांचे वादळीवारे, कडक उन्हाळा यामुळे नुकसान झाले. विमा उतरवणाऱ्या बागायतदारांच्या संख्येत घट झालेली दिसून येते. गतवर्षीच्या ८० टक्के शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ मिळाला आहे.शासनातर्फे यावर्षीदेखील फळपीक विमा योजना सुरू ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. हवामानावर आधारित फळपीक विमा योजना आंबा व काजू या फळपिकांसाठी लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत आंबा पिकासाठी ६ हजार रुपये विमा हप्त्याची रक्कम आहे. संबंधित रक्कम नजीकच्या राष्ट्रीयीकृत, सहकारी बँकेच्या शाखेत भरायची आहे. या योजनेसाठी जिल्ह्यासाठी रिलायन्स कंपनी कार्यरत असून, आंबा पिकासाठी हप्ता भरण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे. ही योजना १ जानेवारी २०१५ ते ३१ मे २०१५ या कालावधीसाठी अवेळी पाऊस, कमी तापमान जास्त तापमान या बाबींसाठी वेगवेगळ्या कालावधीसाठी विविध निकषावर आधारित आहे. आंबा पिकासाठी १ लाख रुपये इतकी विमा संरक्षित रक्कम असून, एकूण हप्त्याची रक्कम १२ हजार रुपये आहे. त्यापैकी ५० टक्के रकमेचा वाटा शासनाचा असून, उर्वरित ५० टक्के म्हणजे ६ हजार रुपये शेतकऱ्याने भरायचे आहेत. बागायतदारांना विम्याची रक्कम नजीकच्या बँकेमध्ये भरणा करावी लागणार आहे. राज्यातील निवडक फळांना पीक विमा योजना जाहीर करताना कोकणातील आंबा, काजू पिकाचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र, १०२४ शेतकऱ्यांचे वादळीवारे, कडक उन्हामुळे उत्पन्नाचे नुकसान झाले. विमा उतरवणाऱ्या बागायतदारांच्या संख्येत घट झालेली दिसून येते. गतवर्षीच्या ८० टक्के शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ मिळाला आहे. यंदा हवामानातील बदलामुळे आंबा, काजूवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने विमा योजनेचा बागायतदारांनी आधार घ्यावा, असे आवाहन कृषी खात्याने केले आहे. (प्रतिनिधी)विमा काढणाऱ्यांच्या संख्येत घटसनबाधित क्षेत्रलाभार्थी भरपाई२०११-१२१८६६.४७१३६२३४ लाख ४१ हजार ५०० रूपये२०१२-१३११२०१२८६२ कोटी ३२ लाख ७९ हजार ५०० रूपये२०१३-१४१४५७ आंबा बागायतदारांनी विमा योजनेचा लाभ घेतला होता.४बदलत्या हवामानामुळे यंदाही नुकसान होण्याची शक्यता.४दरवर्षी विमा काढणाऱ्यांची संख्या कमी-कमी होतेय.४गतवर्षी ८0 टक्के विमाधारकांना मिळाली नुकसानभरपाई.४शासनाकडून भरली जाते विमा हप्त्याची ५0 टक्के रक्कम.