शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
4
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
5
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
6
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
7
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
8
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
9
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
11
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
12
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
13
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
14
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
15
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
16
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
17
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
18
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
19
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
20
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया

आंबा-काजू नुकसान भरपाई घेण्याची पुन्हा संधी

By admin | Updated: July 13, 2017 16:44 IST

दि. १५ जूलैपूर्वी अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन

आॅनलाईन लोकमतलांजा (जि. रत्नागिरी), दि. १३ : शासनाच्यावतीने सन २०१५-१६ मध्ये देण्यात आलेल्या आंबा-काजू नुकसान अनुदानापासून केवळ बँक खाते क्रमांक उपलब्ध नसल्यामुळे लांजा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना वंचित रहावे लागले होते. त्यामुुळे गेले वर्षभर हे अनुदान शासनाकडेच जमा होेते. शिल्लक असलेल्या या अनुदानाचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार असून, दि. १५ जूलैपूर्वी लाभार्थी शेतकऱ्यांनी आपल्या अचूक बँक खाते क्रमांकाच्या प्रती तलाठी कार्यालयामध्ये जमा करुन अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील कार्यालयातर्फे करण्यात आले आहे़ २०१५-१६ साली अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा-काजू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यावेळी शासनाकडून नुकसानभरपाई म्हणून लांजा तालुक्याला १३ कोटी ६६ लाख ११ हजार ७५० रुपये एवढा निधी मंजूर झाला होता. त्यानुसार लांजा महसूल विभागाने तालुक्यातील आंबा-काजू नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी तयार करुन त्या-त्या रकमेचे धनादेश बँकांना अदा करताना लाभार्थी शेतकऱ्यांना रकमेचे वाटप केले होते. मात्र, यावेळी अनेक शेतकऱ्यांनी चुकीचे खाते क्रमांक दिल्याने बँकांनी तहसील कार्यालयाकडे सुधारीत यादी मागितली होती. त्यामुळे चुकीचे खाते क्रमांक असणाऱ्या लाभार्थ्यांना आंबा-काजू नुकसानभरपाईपासून वंचित रहावे लागले होते़

त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे फळपीक नुकसान अदा करण्यासाठी अनुदान प्राप्त झाले असून, या अनुुदानामध्ये मार्च २०१६अखेर समर्पित अनुदान व पुरवणी यादीमधील देय अनुदान रकमेचाही समावेश आहे. लांजा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी चुकीचे खाते क्रमांक दिल्याने तसेच नावातील त्रुटींमुळे मोठ्या प्रमाणात अनुदान शिल्लक राहिले असून, हे अनुदान अजूनही संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा झालेले नाही. खाते क्रमांक व नावात त्रुटी असल्याने अनुदान रक्कम खात्यावर न जमा झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या लांजा तहसील व तलाठी कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

या लाभार्थ्यांना आता अंतिम संधी उपलब्ध करुन देण्यात आली असून, दिलेल्या कालावधीत आपला योग्य खाते क्रमांक न दिल्यास सदरची रक्कम शासनाकडे जमा करण्यात येणार असल्याचे लांजा तहसीलदार मारुती कांबळे यांनी सांगितले.