शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

जिल्ह्यात एकच गटशिक्षणाधिकारी

By admin | Updated: October 18, 2015 00:21 IST

रत्नागिरी जिल्हा : आठ तालुक्यांचा शिक्षणाचा कारभार प्रभारींकडे

रहिम दलाल, रत्नागिरी : शैक्षणिक गुणवत्तेमध्ये राज्यात पुढे असलेल्या रत्नागिरी जिल्ह्याची शैक्षणिक व्यवस्थाच खिळखिळी करण्याचा डाव शासनाचा असल्याचे पुढे येत आहे. कारण जिल्ह्यात नऊ पैकी आठ तालुक्यांमध्ये गटशिक्षणाधिकाऱ्यांचा कारभार प्रभारींकडे आहे. केवळ दापोली पंचायत समितीमध्ये गटशिक्षणाधिकारी कार्यरत आहेत. रत्नागिरी जिल्हा शैक्षणिक गुणवत्तेमध्ये राज्यात प्रथम आला. मात्र, या जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था खिळखिळी होत चालली आहे. कारण जिल्ह्याच्या शैक्षणिक विकास साधणाऱ्या शिक्षण विभागामध्ये अनेक पदे रिक्त आहेत. पटसंख्या पडताळणीची धडक मोहीम राज्यभरात राबवण्यात आली होती. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात एखादं दुसरं उदाहरण वगळता बोगस पटसंख्या नसल्याचे समोर आले होते. शिक्षणाच्या कायद्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार शिक्षकांची संख्याही असली पाहिजे. मात्र, शिक्षकांची भरतीच झाली नसल्याने शासनाच्या या धोरणाचा बोजवारा उडाला आहे. एकीकडे शासन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करुन नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबवत आहे. मात्र, उपक्रम राबवण्यासाठी तालुक्याचा शिक्षण विभागाचा प्रमुख असलेल्या गटशिक्षणाधिकाऱ्याची पदेच रिक्त ठेवण्यात आली आहेत. आधीच जिल्ह्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांची पदे रिक्त असतानाही येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांना जिल्हा बदलीनंतर सोडण्यात आले. त्यामुळे गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमध्ये आणखी भर पडली. आधीच ही पदे रिक्त असताना शासनाने अविचारीपणे गटशिक्षणाधिकाऱ्यांची बदली करुन ही पदे रिक्त ठेवली. यामागे जिल्ह्याची शैक्षणिक व्यवस्थाच खिळखिळी करण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न होत असल्याचा आरोप होत आहे. जिल्ह्यात दापोली तालुका वगळता मंडणगड, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या तालुक्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून गटशिक्षण अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. ही पदभरती करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेने शासनाकडे बऱ्याचवेळा केली आहे. मात्र, शासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे भरतीची मागणी करुनही या पदांची स्थिती ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे जिल्ह्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे.