शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

एकमेव सेलिब्रिटीही मतदारांनी नाकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 23:04 IST

रत्नागिरी : नाट्य-चित्रपटातील सेलिब्रिटी आणि राजकारण यांचे नाते खूप जुने आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही असाच एक प्रयोग १९९८ ...

रत्नागिरी : नाट्य-चित्रपटातील सेलिब्रिटी आणि राजकारण यांचे नाते खूप जुने आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही असाच एक प्रयोग १९९८ साली करण्यात आला. मालवणी भाषा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणाऱ्या मच्छिंद्र कांबळी यांनी राजापूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली. मात्र, हा एकमेव सेलिब्रिटीही मतदारांनी नाकारला.राजकीय पदे, त्यातील मानमरातब, त्यातून मिळणारे अधिकार याचे आकर्षण सेलिब्रिटिंना असते आणि अशा सेलिब्रिटींची लोकप्रियता राजकीय पक्षांना आकर्षित करते. त्यामुळे अभिनेते-अभिनेत्रींना राजकीय रिंगणात उतरवण्याचा खेळ जुनाच आहे. दक्षिणेकडील भागात हे प्रमाण अधिक आहे.वर्षानुवर्षे बॅ. नाथ पै, मधु दंडवते यांच्या पाठीशी ठाम उभ्या राहणाºया राजापूर लोकसभा मतदार संघात सेलिब्रिटिला उतरवण्याचा मोह काँग्रेसला झाला आणि त्यातूनच मच्छिंद्र कांबळी यांचे नाव पुढे आले.‘वस्त्रहरण’च्या माध्यमातून मालवणी भाषेला वलय मिळवून देणारे नाट्य-सिने अभिनेते, निर्माते म्हणून मच्छिंद्र कांबळी यांचे नाव आजही घेतले जाते. काँग्रेसने १९९८ साली त्यांना राजापूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आजवर निवडणूक लढवलेला हा एकमेव सेलिब्रिटी. त्यावेळी त्यांच्यासमोर शिवसेनेकडून तत्कालिन खासदार सुरेश प्रभू तर पुष्पसेन सावंत (जनता दल), नलिनी भुवड आणि किरण ठाकूर (दोन्ही अपक्ष) असे तीन उमेदवार रिंगणात होते. मात्र, मुख्य लढत झाली ती कांबळी आणि प्रभू यांच्यामध्येच. त्यात कांबळी यांना १ लाख ५२ हजार ७२४ मते मिळाली. यावेळी २ लाख १७ हजार ७६६ मते मिळालेले सुरेश प्रभू विजयी झाले.एकदाच झाला प्रयोगकोकणातील अनेक कलाकार नाट्य-सिने क्षेत्रात प्रसिद्धीच्या झोतात आहेत. मात्र, एकदा झालेला प्रयोग फसल्यानंतर पुन्हा हा प्रयोग कोणीही केला नाही. कोकणातील मतदारांनी आजवर पक्ष पाहूनच मतदान केल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. कांबळी यांच्या निवडणुकीतही तेच अधोरेखित झाले होते.