खेड : शहरातील एमआयबी गर्ल्स ज्युनिअर कॉलेजमध्ये ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय क्रीडा दिन आयोजित करण्यात आला होता. मुख्याध्यापक शहाबुद्दीन परकार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रप्रमुख चवरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. क्रीडा शिक्षक विजय मोहिते यांनी या दिवसाचे महत्त्व सांगितले.
टेहळणी मनोरा धोकादायक
गणपतीपुळे : गणपतीपुळे येथे तीर्थक्षेत्रासह पर्यटन स्थळाजवळील समुद्रकिनाऱ्यावर जीवरक्षकांसाठी लाखो रुपये खर्च करून टेहळणी मनोरा उभारण्यात आला आहे. मात्र हा मनोरा आता पूर्णत: गंजला असून कोणत्याही क्षणी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. किनारपट्टीवर दोन ठिकाणी टॉवर उभारले होते. एक आधीच जमीनदोस्त झाला आहे.
पूरग्रस्तांना मदत
चिपळूण : कोरो इंडियाच्या सौजन्याने स्वप्नतेज एज्युकेशन ॲण्ड सोशल फाऊंडेशनतर्फे ६५० पूरग्रस्तांना जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले. यात चटई, ब्लँकेट, चादर आणि अन्नधान्य या साहित्याचा समावेश होता. यावेळी कोरो इंडियाच्या अमिता जाधव आणि स्वप्नतेज संस्थेचे चेअरमन आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
तीन दिवस बँका बंद
रत्नागिरी : सप्टेंबरमध्ये बँकांना एकूण सात दिवस सुट्टी मिळणार आहे. १० रोजी गणेशचतुर्थी, ११ रोजी दुसरा शनिवार आणि १२ रोजी रविवार असे सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. याशिवाय ५ सप्टेंबर, १९ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि २६ सप्टेंबर या दिवशी रविवार आणि शनिवार अशा सुट्ट्या असल्याने बँका बंद राहणार आहेत.
पूरग्रस्तांना मदत
चिपळूण : शहर आणि परिसरात आलेल्या महापुरामुळे तालुक्यातील ओवळी या खेडेगावातील आदिवासींनाही पुराचा फटका बसला आहे. या पूरग्रस्त वस्तीमध्ये रिटेनमायेर इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तू आणि औषधांचे वाटप करण्यात आले.