शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

ओंकार पतसंस्था घोटाळा; व्यवस्थापिकेवर अखेर गुन्हा दाखल

By admin | Updated: August 3, 2016 00:44 IST

अपहार झाल्याचे आॅगस्ट महिन्यात उघडकीस

देवरुख : सातत्याने आॅडिट ‘अ’ वर्गात असलेल्या देवरूख शहरातील ओंकार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत अपहार झाल्याचे आॅगस्ट महिन्यात उघडकीस आले होते. त्यानंतर आजपर्यंत शासकीय लेखापरीक्षण चालू होते. मात्र, शासकीय लेखापरीक्षण अत्यंत धीम्या गतीने होत असल्याचे पाहून संचालक मंडळाने पॅनेलवरील लेखा परीक्षकांकडून अंतर्गत लेखा परीक्षण करुन घेऊन देवरुख पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर तत्कालीन व्यवस्थापिका वासंती अनिल निकम - केदारी (४०) देवरुख हिच्यावर २ कोटी ५५ लाख ७४ हजार २४१ रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतसंस्थेतील सभासदांच्या ठेवी पावत्यांवर कर्जे काढून हा अपहार १ एप्रिल ते २०११ ते २४ आॅगस्ट २०१५ या कालावधीत करण्यात आला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरुन व्यवस्थापिका वासंती निकम-केदारी हिने बनावटीकरण करुन संस्थेचा न्यास भंग केल्याप्रकरणी व्यवस्थापिकेवर सोमवारी रात्री उशिरा देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखला केला आहे. ओंकार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, देवरुख या पतसंस्थेत ठेवींवरच जादा कर्ज घेतल्याचे संचालक मंडळाच्या लक्षात आल्यानंतर याविषयी मंडळाने बारकाईने अभ्यास केल्यानंतर मोठा अपहार झाला असल्याचे संचालक मंडळाच्या लक्षात आले. १४ आॅगस्ट रोजी ठेवींवर बनावटरित्या कर्जे घेऊन अपहार झाल्याचे ठामपणे संचालक मंडळाच्या लक्षात आले. त्यावेळी देवरुखमध्ये एकच उलटसुलट चर्चा ऐकायला येत होती. याचवेळी संचालकांनी पत्रकार परिषद बोलावून अपहार झाल्याची माहिती जाहीर केली. यावेळी काही ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यात आल्या. बहुतांश ठेवीदारांना समजावण्यात आले. याच काळात या अपहाराला व्यवस्थापिका निकम हिला दोषी ठरवून व्यवस्थापिका पदावरुन निलंबित करण्यात आले. अपहार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर संचालक मंडळाने याप्रकरणी अनेक बैठका घेतल्या. तज्ज्ञांची मते जाणून घेतली. तसेच ६ सप्टेंबरदरम्याने पतसंस्थेचे शासकीय लेखा परीक्षण व्हावे, यासाठी जिल्हा निबंधकांकडे रितसर अर्ज करुन लेखा परीक्षणाची मागणी केली. मात्र, शासकीय लेखा परीक्षणातील अनियमितपणा आणि अत्यंत धीम्या पध्दतीने चाललेले शासकीय लेखा परीक्षण वर्षभरात पूर्णत्त्वास जाईल, अशी शक्यता नसल्याने संचालक मंडळाने पॅनेलवर असणाऱ्या लेखा परीक्षक प्रभात तेंडुलकर यांच्याकडून अंतर्गत खासगी लेखा परीक्षण करुन घेतले. हे लेखा परीक्षण हाती मिळाल्यानंतर पतसंस्थेचे अध्यक्ष राजाराम जोशी आणि संचालक मंडळ यांनी पोलिसांना अहवाल दिला आणि तक्रार घेण्याविषयी सांगितले. मात्र, शासकीय लेखा परीक्षणाची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष राजाराम जोशी आणि मंडळाने आपले म्हणणे अखेर देवरुख न्यायालयात मांडले आणि याविषयी रितसर लेखी तक्रार केली. याबाबत देवरुख पोलिसांना तक्रार दाखल करुन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर सोमवारी व्यवस्थापिका निकम हिच्या विरुध्द देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भा. दं. वि. ४०६, ४०८, ४०९, ४२०, ४६७, ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलस निरीक्षक राजेंद्र यादव करीत आहेत. पोलिसांनी निकम यांच्या घराची मंगळवारी झाडाझडती घेतली. देवरुखात दिवसभर महिला पोलिसांची तुकडी तैनात होती. (प्रतिनिधी) व्यवस्थापिका वासंती निकम-केदारी या १९९५पासून २४ आॅगस्ट २०१५ पर्यंत पतसंस्थेत कार्यरत होत्या. या अपहारामुळे तिला निलंबित करण्यात आले. हा अपहार अन्य ठिकाणांहून महिन्याला मिळणाऱ्या जादा व्याजासाठी होत होता काय? आणि तसे असेल तर त्या मुळापर्यंत जाऊन त्या मुळाचीच पाळेमुळे खणून काढावीत, अशीही भावना पतसंस्थेच्या मंडळाने तक्रारीत नमूद केली आहे. त्यामुळे जादा व्याज देणाऱ्यांवरही कारवाई अटळ आहे.