शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांची चौकशी

By admin | Updated: February 23, 2015 00:22 IST

अनिल शिगवण : खेडच्या शेतकरी मेळाव्याला अनेकांची दांडी

खेड : शेतकऱ्यांचे हित साधताना कोणतीही तडतोड केली जाणार नाही. मेळाव्याला दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल, असे आश्वासन जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती डॉ. अनिल शिगवण यांनी दिले. भरणे येथील वारकरी मठामध्ये खेड तालुका भुमिपूत्र शेतकरी संघाच्या वर्धापनदिनानिमित्त संघाच्यावतीने तालुकास्तरीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी अध्यक्षस्थानावरून अनिल शिगवण बोलत होते.शेतकऱ्यांचे हित साधताना कोणतीही तडतोड केली जाणार नाही. शासनाच्या सर्व योजनांचा लाभ जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आश्वासन देत कृषी विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य ती माहिती मिळवून शेतकऱ्यांनी आपला उत्कर्ष साधावा, असे आवाहन त्यांनी केले. अनेक शेतकरी शेतीसंबंधित काम घेऊन गेल्यावर हेच अधिकारी कार्यालयात उपस्थित नसतात. काही वेळेला विविध कारणे देत काम होणार नसल्याचे सांगितले जात असल्याने आधुनिक शेती करताना अडथळे येत असल्याचे या शेतकऱ्यांनी आमदार संजय कदम आणि डॉ़ अनिल शिगवण यांना सांगितले. यावर डॉ़ अनिल शिगवण यांनी नाराजी व्यक्त करीत यापुढे कडक धोरण अवलंबणार असल्याचे सांगितले. या शेतकरी मेळाव्याला अनुपस्थित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत यावेळी डॉ. शिगवण यांनी दिले.याशिवाय पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त शिवार, शासनाच्या व जिल्हा परिषदेच्या योजना याविषयी डॉ. शिगवण यांनी उत्कृष्टरित्या मार्गदर्शन केले. शेतकरी देशाचे सर्वस्व असून, शेतकऱ्यांसाठी विविध सवलतींच्या माध्यमातून प्रगती करणे आवश्यक असल्याचा सूर आमदार संजय कदम यांनी आळवला. आपण स्वत: एक शेतकरी आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांचे दु:ख आपण समजू शकतो.संस्थेचे संस्थापक व कार्याध्यक्ष वसंत गुरव यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे अध्यक्ष नितीन आंब्रे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि न्याय हक्कांसाठी संघर्ष करण्याची तयारी असल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या सवलतीच्या योजना शेतकऱ्यांना योग्यरितीने समजावून सांगा, असे आवाहन उपस्थित अधिकाऱ्यांना केले. या शेतकरी मेळाव्याला खेडचे प्रांताधिकारी जयकृष्ण फड, तहसीलदार प्रकाश संकपाळ, आवाशी येथील मृदसंधारण विभागाचे संशोधक वैभव शिंदे, उपसभापती रवींद्र मोरे, माजी उपसभापती रामचंद्र आईनकर, पंचायत समिती सदस्य सचिन दळवी उपस्थित होते. (प्रतिनिधी)