शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींना ओएफसी जोडणी

By admin | Updated: November 23, 2014 23:44 IST

खेड तालुका : सहा कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

खेड : बीएसएनएल ग्रामीण भागातील जलदगती सेवेसाठी नॅशनल फायबर आॅप्टिकल नेटवर्क हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच साकारत आहे़ जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर, मंडणगडसह खेड तालुक्याचाही यात समावेश करण्यात आला असून, खेड तालुक्यातील ११४ ग्रामपंचायती जोडल्या जाणार आहेत़ यासाठी ६ कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे़ मार्च २०१५ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे बीएसएनएलचे प्रयत्न आहेत. यामुळे जलद संपर्क साधणे शक्य होणार आहे.महाप्रबंधक सुहास कांबळे यांनी ही माहिती जाहीर केली़ या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे़ बीएसएनएलच्या मालकीचे जे टॉवर्स खासगी कंपनीने भाडेतत्त्वावर घेतले आहेत़, त्यासंबंधीच्या अटी आणि शर्ती संबंधित कंपन्यांनी पूर्ण न केल्याने हे टॉवर्स पडून आहेत, हेच टॉवर्स या कंपन्यांकडून घेऊन त्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून ग्राहकांना अधिकाधिक सेवा देण्याचा प्रयत्न होणार आहे. सध्या जिल्हाभरात वील, लँडलाईन, प्रोडॉड, आयटीसी, डाटा, मोबाईल, लीस्ड लाईन, आयएसडीएन आदी सेवा सुरू आहेत. कमी भाडे, तांत्रिक समस्येचे निवारण, जलद सेवा, सिंगल विंडो सर्व्हिस आणि प्रवासात कोठेही वापरावी, अशा सेवा सध्या सुरू असल्याने देशभरात सर्वत्र जाळे पसरले आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांनाही याचा लाभ मिळणार आहे. इंटरनेटसह सर्वच सुविधा या प्रकल्पामध्ये उपलध होणार असल्याने लवकरच या कामांना प्रारंभ होणार आहे. खेड तालुक्यातील काही प्राथमिक शाळा तसेच माध्यमिक शाळादेखील इंटरनेटने जोडण्यात येणार आहेत़ यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने खेड तालुक्यात विकासाचे नवे पर्व सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. (प्रतिनिधी)११४ ग्रामपंचायती कनेक्ट होणारमार्च २०१५ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे बीएसएनएलचे प्रयत्न.खेड तालुक्यातील ११४ ग्रामपंचायती जोडल्या जाणार.महाप्रबंधक सुहास कांबळे यांची माहिती.प्राथमिक शाळा तसेच माध्यमिक शाळादेखील इंटरनेटने जोडणार.