शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

गंगाक्षेत्र विकासाच्या मार्गातील अडथळे अखेर दूर

By admin | Updated: September 22, 2016 00:49 IST

विविध ठिकाणांची पाहणी : सार्वजनिक उपक्रम समितीची राजापूरला भेट

राजापूर : महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय सार्वजनिक उपक्रम समितीच्या वतीने राजापुरातील सुप्रसिध्द अशा गंगा क्षेत्राची पाहणी करण्यात आली. त्यामुळे शासकीय पातळीवरून या क्षेत्राचा विकास होण्याच्या मार्गातील अडथळे दूर झाले आहेत. विधानसभेचे आमदार डॉ. सुनील देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने रत्नागिरी जिल्हा दौऱ्यात विविध ठिकाणांची पाहणी केल्यानंतर राजापुरात गंगाक्षेत्राची पाहणी केली. देश-विदेशात प्रसिध्द असणाऱ्या गंगेचे आगमन ऐन पावसाळ्यात झाले असून, ती पूर्ण क्षमतेने प्रवाहीत आहे. या पर्यटनस्थळाचा ज्या प्रमाणात विकास व्हायला हवा तसा झाला नाही, त्याची दखल राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी घेऊन प्रयत्न केले. त्या पार्श्वभूमीवर शासनाच्या महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय, सार्वजनिक उपक्रम समितीने रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे, लांजा तालुक्यातील माचाळ याठिकाणी जाऊन पाहणी केली. माचाळसारखे निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण तर साक्षात महाबळेश्वरची आठवण करून देते, असे गौरवोद्गार समितीचे अध्यक्ष डॉ. सुनील देशमुख यांनी काढले. आजवर त्या पर्यटनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ठिकाणाबाबत कोणालाच पत्ता नव्हता. मात्र, यावेळी समितीच्या माध्यमातून पाहणी केल्यानंतर तेथील सौंदर्य दिसले, त्याचे श्रेय आमदार राजन साळवींना असल्याचे ते म्हणाले. यापूर्वी आमदार साळवींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माचाळबाबत पत्रव्यवहार केला होता. स्वत: मुख्यमंत्र्यांनीही अनुकूलता दर्शवली होती. त्यानुसार तेथे जाऊन समितीने पाहणी केली आहे. आता आमदार साळवी यांच्या विनंतीनुसार राजापूरच्या गंगाक्षेत्राची पाहणी करण्यात आल्याचे समितीचे अध्यक्ष डॉ. सुनील देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. एखादा उद्योग आणला तर साधारणपणे अठरा ते वीसजणांना रोजगार मिळतो. मात्र, पर्यटनाच्या दृष्टिने विचार केल्यास सत्तर ते ऐंशी जणांना रोजगार मिळतो. त्यामुळे रोजगारासाठी पर्यटन उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आजवर दुर्लक्षित राहिलेल्या या ठिकाणांच्या विकासाचा प्रश्न हाती घेण्यात आला आहे. राजापूरच्या गंगा स्थानाबाबतही आवश्यक ते प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. डॉ. सुनील देशमुख यांच्यासमवेत आमदार आकाश फुंडकर, आमदार राजन साळवी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एस. बोबडे, राजापूरचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, गटविकास अधिकारी शिवाजी माने, सभापती सोनम बावकर, उपसभापती उमेश पराडकर उपस्थित होते. गंगाक्षेत्राचे अध्यक्ष मंदार सप्रे, श्रीकांत घुगरे व अन्य मान्यवरांचा यात समावेश होता. महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय सार्वजनिक उपक्रम समितीकडून झालेल्या पाहणीमुळे भविष्यात या क्षेत्राचा विकास होण्याचा मार्ग अधिक प्रशस्त बनला आहे. (प्रतिनिधी)