शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

राजापुरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा ८४ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:52 IST

राजापूर : शहरातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच, सोमवारी शहरातील एस.टी. डेपो, गुरववाडी परिसरात करण्यात आलेल्या तपासणीत एकाचवेळी २० जणांचे ...

राजापूर : शहरातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच, सोमवारी शहरातील एस.टी. डेपो, गुरववाडी परिसरात करण्यात आलेल्या तपासणीत एकाचवेळी २० जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या सर्वांना तत्काळ उपचारासाठी रायपाटण कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. तशी माहिती नगर परिषद प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

या परिसरातील १४ घरांची तपासणी करण्यात आली असून, हा परिसर कंटेन्टमेन्ट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. शहरातील ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा ८४ वर गेला आहे.

रविवारी राजापूर शहरात एस.टी. डेपो, गुरववाडी व बंगलवाडीत दोनजणांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. यानंतर तत्काळ नगर परिषद प्रशासन व आरोग्य विभागातर्फे या भागात सर्वेक्षण करून तपासणी करण्यात आली. या भागात ११६ जणांची अ‍ॅन्टिजेन तपासणी करण्यात आली. त्यात २० जण पॉझिटिव्ह आले आहेत. एस.टी. डेपो, गुुरववाडी भागातील कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाने एका लग्नसमारंभात हजेरी लावली होती. त्यामुळे या परिसरातील १४ घरांतील व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यात २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बंगलवाडी येथील त्या मृत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबियांना होमआयसाेलेट करण्यात आले आहे.