शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

आता नागरिकांचे हेलपाटे वाचणार

By admin | Updated: November 28, 2014 00:09 IST

आठ दिवसांत ‘नागरी सुविधा केंद्र’ सुरू

रत्नागिरी : पोलीस विभागाशी संबंधित विविध कामांसाठी नागरिकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, त्यांचा वेळ वाचावा, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाशेजारील नियंत्रण कक्षाच्या ठिकाणी येत्या आठ दिवसांत ‘नागरी सुविधा केंद्र’ सुरू केले जाणार आहे. याठिकाणी नागरिकांनी सर्व कागदपत्रांसह अर्ज दाखल केल्यानंतर त्याचा निपटारा किती दिवसात होणार, हे त्याचवेळी अर्जदारास कळणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संजय शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या नागरी सुविधा केंद्रात पासपोर्ट पडताळणी, विद्यार्थीसंबंधित कागदपत्रांची पडताळणी, पोलीस क्लियरन्स, हॉटेलला व पेट्रोलपंपाना लागणारे नाहरकत दाखले, सायबर कॅफे परवाना या गोष्टी नागरिकांना ठराविक मुदतीत मिळाल्या पाहिजेत, याची दक्षता घेतली जाणार आहेत. या कामांसाठी अर्ज करताना कोणती कागदपत्र लागणार आहेत, हे पहिल्यांदाच सांगितले जाणार आहे. सर्व कागदपत्रांसह अर्ज दाखल केल्याची तारीख विशेष रजिस्टरमध्ये दाखल होणारच, परंतु त्याचवेळी हे काम पूर्ण होऊन कोणत्या दिवशी मिळेल, हेसुध्दा त्याचवेळी संबंधित अर्जदाराला कळणार आहे. अर्ज स्वीकारण्याचा दिनांक व पूर्तता दिनांक अशा स्वतंत्र रजिस्टरमधील नोंदीवरून पूर्तता दिवसाच्या चार दिवस आधी या कामांचा पाठपुरावा घेतला जाणार आहे, असे अधीक्षक शिंदे यांनी सांगितले. पोलिसांच्या कामांसाठी १०९३ नंबरने हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अडचणी, रखडलेल्या कामांबाबत तातडीने दखल घेणे, सोडवणूक करणे शक्य होणार आहे. रत्नागिरीप्रमाणे पोलिसांसाठी कर्मचाऱ्यांसाठी चिपळुुणात ग्राहक भांडार सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात पती-पत्नीमधील वाद-विवादाचे प्रमाण अधिक असून, त्याबाबत पोलीस दक्षता विभागाकडून चांगले काम सुरू आहे. रत्नागिरी, राजापूरसह आता खेडमध्येही महिला बालकल्याण केंद्र सुरू होत आहे, अशी माहितीही शिंदे यांनी दिली. (प्रतिनिधी)