शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

घरांवर लागणार आता नंबर प्लेट

By admin | Updated: August 31, 2014 00:34 IST

चिपळूण पालिका : प्रस्ताव पाठवण्याबाबत विशेष सभेची घेणार मंजुरी

चिपळूण : नगर परिषद हद्दीमध्ये अंदाजे २२ हजार मालमत्ताधारक असून त्यांच्या घराच्या दारावर मालमत्ता क्रमांक नमूद असलेली नंबर प्लेट बसविण्यात येणार आहे. यासाठी ९ लाख रुपये खर्च येणार असून या खर्चास व प्रस्ताव पाठविण्याबाबत मंजूरी घेतली जाणार आहे. यावर दि. १ सप्टेंबर रोजी होणाऱ्या विशेष सभेत शिक्कामोर्तब केले जाणार आहे.घराच्या दारावर नंबर प्लेट बसवण्याची पालिकेची ही योजना लवकरच मूर्त स्वरूपात येणार आहे. याबाबत १ सप्टेंबरच्या सभेत चर्चा होऊन मंजुरी देण्यात येणार आहे. चिपळूण पालिकेने पहिल्यांदाच हा उपक्रम राबवला आहे.१३व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून जिल्हा नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत निधी मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. चिपळूण नगर परिषदेतील कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना दिवाळी सणासाठी सानुग्रह अनुदान यावर्षीही दिले जाणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड योग्य आहे, त्यांनाच या सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळणार असून ज्या कर्मचाऱ्यांचे कामावर दुर्लक्ष आहे. विभाग स्तरावर चौकशी आहे. सतत गैरहजर असणारे कर्मचारी यांचा या अनुदानासाठी विचार करण्यात येवू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. नगर परिषद बांधकाम विभागाकडे सेवा तत्वावर सिव्हील इंजिनिअर पुरविण्याच्या कामाचा ठेका दि. १६ जुलै रोजी संपला आहे. सेवा तत्वावर ३ सिव्हील घेण्यासाठी ५ लाख ७२ हजार खर्चास प्रशासकीय व आर्थिक मंजुरी घेतली जाणार आहे.चिपळूण नगर परिषद प्रशासनातर्फे बांधण्यात आलेल्या महर्षी अण्णासाहेब कर्वे भाजी मंडईचे गेल्या दोन महिन्यापूर्वीच उद्घाटन झाले आहे. आरक्षण क्र. ४० भाजी मंडईमधील गाळ्यांमध्ये लिलावाची अट रद्द करुन लॉट पद्धतीने गाळे दिले जाणार आहेत.याबाबत सहाय्यक कार्यालय पर्यवेक्षक यांच्या रिपोर्टवर चर्चा करुन निर्णय घेतला जाणार आहे. सत्ताधारी व विरोधक या संदर्भात कोणती भूमिका घेणार याकडे चिपळुणातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. (वार्ताहर)चिपळुणातील २२ हजार घर मालकांचा समावेश१३ वा वित्त आयोगाच्या अनुदानातून जिल्हा नावीन्यपूर्ण निधीअंतर्गत ९ लाख रुपये नगर परिषद फंडातून भरण्याबाबत विशेष सभेत होणार चर्चानगर परिषदेतील कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना दिवाळीत मिळणार सानुग्रह अनुदानभाजी मंडईमधील गाळ्यांमध्ये लिलावाची अट रद्द करुन लॉट पद्धतीने गाळे देण्याबाबत सहाय्यक कार्यालय पर्यवेक्षक यांच्या रिपोर्टवर चर्चा होणार