शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

आता पिकांचे होणार सर्वेक्षण

By admin | Updated: September 6, 2016 23:42 IST

एकात्मिक कीड व्यवस्थापन : सततच्या पावसामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव

रत्नागिरी : एकात्मिक कीड व्यवस्थापन कार्यक्रम कृषी विभागाने हाती घेतला आहे. यावर्षी सुरूवातीपासून पर्जन्यमान चांगले राहिले आहे. सततच्या पावसामुळे कीडरोग तसेच करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. गतवर्षी अल्प पर्जन्यमानामुळे भात पिकाचे नुकसान झाले होते. यावर्षी पिकाचे नुकसान होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांना सावध करून उपाय-योजनेसाठी कृषी विभागाने एकात्मिक कीड व्यवस्थापन कार्यक्रम हाती घेतला आहे.गरवे, निमगरवे तसेच संकरीत भात पिकाची लागवड करण्यात येते. गरवे भात फुलोऱ्यास आले आहे. निमगरवे भात फुलोऱ्यास येण्याच्या अवस्थेत आहे. संकरीत भात तयार होण्यास अद्याप अवकाश आहे. गरव्या पिकासाठी पावसाचे प्रमाण कमी असणे गरजेचे आहे. पहाटेच्या वेळेचा तर पाऊस पिकास नुकसानग्रस्त ठरू शकतो. शिवाय उन्हाचा कडाका वाढला तरी पिकावर त्याचा परिणाम होऊ शकतो. ढगाळ वातावरणात पाने गुंडाळणारी अळी, निळे भुंगेरे यांसारख्या कीडीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. एकूणच बदलत्या हवामानाचा पिकावर होणारा परिणाम व त्यावेळी शेतकऱ्यांनी तत्काळ कोणत्या उपाययोजना कराव्यात, कोणत्या कीटकनाशकांची फवारणी करावी, याबाबत माहिती कृषी पर्यवेक्षक, निरीक्षक माहिती देणार आहेत. भातपिकाच्या पाहणीबरोबर भातकापणीचा आढावा घेण्यात येणार आहे. मोबाईल अ‍ॅप कृषी विभागाने सुरू केले असून, कापणी व पिकाचा आढावा, माहिती मोबाईलव्दारे संकलित केली जाणार आहे. कीडरोग व्यवस्थापनाबद्दल विद्यापीठातील तज्ज्ञांतर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने पिकाची परिस्थिती समाधानकारक आहे. सद्यस्थितीत पीक परिस्थिती उत्तम असल्याची माहिती कृषी अधीक्षक जगताप यांनी दिली. मात्र, अजून पाऊस पडण्याची शक्यता आहे. आॅक्टोबर, नोव्हेंबरपर्यंत पाऊस असतो. अनेकवेळा कापणीच्या हंगामात पावसाचे प्रमाण वाढते व शेतकऱ्यांचे नुकसान होते. कापलेले भातपीक पाण्यात राहिल्याने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी पीक विमा योजना सुरू केली आहे.जिल्ह्यात किरकोळ कीड व करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र, शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून उपाययोजना करण्यासाठी भाग पाडल्याने कीडरोग आटोक्यात आहे. भविष्यात पीक वाचवण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील असून, शेतकऱ्यांना त्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)जगताप : आतापर्यंत जिल्ह्यात ३० हजारपेक्षा जास्त मिमी पाऊसरत्नागिरी जिल्ह्यात ७० हजार हेक्टर क्षेत्र भातपीक, तर २१ हजार हेक्टर क्षेत्रावर नागलीची लागवड करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३० हजार मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. जिल्हा कृषी अधीक्षक एस. एस. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ३६ पर्यवेक्षक, २५० निरीक्षक भातशेतीचे सर्वेक्षण करणार आहेत.