शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

पाणीसंकट नाही

By admin | Updated: July 4, 2014 00:12 IST

एमआयडीसीचा दिलासा : कुवारबावसह सात ग्रामपंचायतींचा समावेश

रत्नागिरी : रत्नागिरीतील मिरजोळे औद्योगिक वसाहतीबरोबरच परिसरातील सात ग्रामपंचायतींच्या नळपाणी योजनांना आणखी पंधरा दिवस पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होईल, इतका पाणीसाठा हरचेरीसह अन्य धरणात आहे. त्यामुळे सध्यातरी पाणी कपातीचे कोणतेही संकट नाही, अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ, रत्नागिरी विभागाचे कार्यकारी अभियंता परशुराम करावडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. यामुळे कुवारबाव व परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.औद्योगिक वसाहतीसह रत्नागिरीतील कुवारबाव, नाचणे, पोमेंडी, शिरगाव, मिरजोळे, कर्ला व मिऱ्या ग्रामपंचायतींना एमआयडीसीकडून पूर्ण तर रत्नागिरी नगरपरिषदेला अंशत: पाणीपुरवठा केला जातो. गेल्या वर्षी हरचेरी धरणातील पाणीसाठा मे महिन्यातच संपुष्टात आल्याने या सर्वच नळपाणी योजना संकटात सापडल्या होत्या. त्यातील काही ग्रामपंचायतींनी नागरिकांसाठी पाण्याची पर्यायी व्यवस्था केली होती, तर काहींनी या क्षेत्रातील नागरिकांना वाऱ्यावर सोडले होते. या पार्श्वभूमीवर यंदा हरचेरी धरणातील पाणी स्थिती काय आहे, याची विचारणा केल्यावर करावडे बोलत होते. येत्या १५ दिवसांत या सर्वच ग्रामपंचायतींच्या योजनांना दिल्या जाणाऱ्या पाण्यात कोणतीही कपात केली जाणार नाही. त्यानंतरही पावसाने पाठ फिरविल्याने पाणीसाठा कमी झालाच तर काही प्रमाणात पाणी कपातीचा विचार केला जाऊ शकतो. मात्र, तशी स्थिती येईल, असे वाटत नसल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले. एमआयडीसीमार्फत गेल्या वर्षीचे संकट लक्षात घेऊन त्यानंतर तातडीने पाणी साठवणुकीबाबत आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळेच यंदा पाणी स्थिती उत्तम राखता आली. सध्या रत्नागिरी एमआयडीसी क्षेत्राला ४ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जात असून, रत्नागिरी नगरपालिकेला १.७ दशलक्ष लीटर्स पाणी पुरविले जात आहे. ग्रामपंचायतींना एक हजार लीटरला ७.५० रुपये दर आकारला जात आहे. उद्योगांना एक हजार लीटरला २५ रुपये दर आकारला जात आहे. (प्रतिनिधी)